यावेळी जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र माने, मलकापूर शहराध्यक्ष राजेंद्र यादव, इंद्रजीत चव्हाण, राहुल चव्हाण, जाकीर पठाण यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार उपस्थित होते.
पुणे-बंगळुरु आशियाई महामार्ग आणि कऱ्हाड-तासगांव मार्गाला जोडण्यासाठी कऱ्हाड व मलकापूर शहरातील किंवा रेठरे पूल हे एकमेव रस्ते होते. याशिवाय पर्यायी शॉर्टकट रस्ता उपलब्ध नव्हता. या परिसरातील गावांची अडचण व शहरांमधील वाहतुकीची कोंडी विचारात घेऊन पाचवडेश्वर ते कोडोली दरम्यान कृष्णा नदीवर पुलाची उभारणी करणे आणि आशियाई महामार्ग कऱ्हाड-तासगाव राज्यमार्गाला जोडणे आवश्यक होते. ही गरज ओळखून कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी या पर्यायी रस्त्यासह पुलाचे सर्वेक्षण करण्यास सांगितले. तसा आराखडा तयार केला.
आमदार चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा करुन रस्त्यासह पुलाची मंजुरी मिळवली. या पुलाच्या कामासाठी आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नाने ४५ कोटींचा निधी मंजूर झाला. या पुलाच्या उभारणीला लवकरच सुरुवात करण्यासाठी भूस्तर तपासणी करण्यात आला आहे.
- कोट
पाचवडेश्वर येथे कृष्णा नदीवरील पुलासाठी ४५ कोटी निधी मंजूर आहे. या पुलामुळे पुणे-बंगळुरु आणि कऱ्हाड-तासगाव हे दोन्ही मार्ग जोडले जातील. दोन खोऱ्यांना जोडणाऱ्या या पुलामुळे कऱ्हाड आणि मलकापूर शहरातील वाहतूक व दळणवळणाचा भार कमी होईल. पाचवडेश्वर परिसरासह कोडोली, दुशेरे, कार्वे, शेणोली, गोंदी अशा आनेक गावांच्या शहरीकरणासह विकासाला चालना मिळेल.
- पृथ्वीराज चव्हाण
आमदार, कऱ्हाड दक्षिण
- चौकट
प्रत्येकी ४० मीटर अंतराचे ८ पिलर
प्रत्येकी ४० मीटर अंतराच्या ८ पिलरवर पूल उभा केला जाणार आहे. त्यावरील रस्ता सहापदरी असणार आहे. दोन्ही बाजूच्या रस्त्याचे कामही पूर्ण होणार आहे. लवकरच टेंडर निघेल. त्यानंतर भव्य स्वरूपात भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला जाईल, अशी माहिती यावेळी आमदार चव्हाण यांनी दिली.
फोटो : ०९केआरडी०३
कॅप्शन : पाचवडेश्वर, ता. कऱ्हाड येथे उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या भूस्तर तपासणीस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.