शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

हंडाभर पाण्यासाठी तासभर खडा पहारा!

By admin | Updated: March 16, 2016 23:42 IST

शिंगाडवाडीत पाणीप्रश्न गंभीर : हातपंपावर पहाटेपासूनच लागतायत रांगा; टँकर सुरू करण्याची मागणी--खोल-खोल पाणी !

विठ्ठल नलावडे -- कातरखटाव --भीषण दुष्काळात होरपळणाऱ्या खटाव तालुक्यातील शिंगाडवाडी या वस्तीवर विहिरी, बोअर, हातपंपाला पाणी कमी आल्यामुळे येथील महिला व नागरिकांना पाणीटंचाईचे तीव्र चटके सहन करावे लागत आहेत. हंडाभर पाण्यासाठी तासन्तास हातपंपावर थांबावे लागत आहे. या वस्तीवर टँकर सुरू करण्यासाठी प्रस्तावही देण्यात आला आहे. मात्र अद्याप टँकर सुरू नाही. त्यामुळे शिंगाडवाडी ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.कातरखटाव ग्रामपंचायतीतील सुमारे ४५० लोकवस्ती असलेली शिंगाडवाडी १९९७ पासून पाणी समस्येच्या विळख्यात अडकलेली आहे. दरवर्षी ऐन उन्हाळयात येथील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. शिंगाडवाडीला पाणीपुरवठा करणारी सामुदायिक विहीर गाळाने भरली असून वर्ष झालं या विहिरीत चार ते पाच बादल्या पाण्याचा मृत साठा राहिलेला आहे. उन्हाळयाची तीव्रता वाढत चालल्यामुळे शिंगाडवाडी परिसरातील बहुतांश जलस्रोत कोरडे पडत चालले आहेत. लहान-थोरांना भल्या पहाटेपासून हातपंपावर हंडा घेऊन रांगेत उभे रहावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी तू-तू मै-मै करावी लागत आहे. किमान ३० ते ४० पंप मारावे तेव्हा कुठे एक कळशी भरत आहे. माणसापेक्षा जनावरांची वाईट अवस्था दिसून येत आहे. पाणीपातळी खालावल्यामुळे हातपंप जाचत आहेत. सध्या शिंगाडवाडी वस्ती, मुस्लीम वस्ती, मातंग वस्तीला पाणीटंचाई निर्माण झाली असून टँकर सुरू करण्याची गरज आहे. दरवर्षी ऐन उन्हाळयात या भागात पाणीटंचाई पाचवीला पुजली आहे. या भागाला वरदान ठरलेला रंगसिंग पाझर तलाव गेली तीन वर्षे लागोपाठ पाऊस कमी झाल्याने कोरडा पडला आहे. अशा परिस्थितीवर मात करीत शिंगाडवाडी व परिसरातील नागरिक हंडाभर पाण्यासाठी कोसभर पळत आहेत. त्यामुळे ‘आमच्या वाडीत प्रशासनाचा टँकर कधी येणार?, असा सवाल येथील लोकांनी केला आहे. अन्यथा आंदोलन उभारणार...पोटापाण्यासाठी रोजंदारीला जायचं म्हणून पहाटे पाच वाजता उठून महिला दोन-दोन हांडे घेऊन रांगा लावत आहेत. अजून किती दिवस शिंगाडवाडीच्या लोकांची प्रशासन परीक्षा पाहणार आहे? प्रशासनाने शिंगाडवाडीतील पाईपलाईनचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. रात्री बारा वाजता एका हांड्यासाठी हातपंपावर एक तास बसावं लागत आहे. कोणीही एका हांड्यापेक्षा जास्त पाणी भरू देत नाही. रोज हातपंपावर हंडाभर पाण्यासाठी वाद होत आहेत. विहिरीतील खराब पाणी धुण्याला वापरावं लागत आहे. प्रशासनाने तातडीने टँकर सुरू करावा. - हरिचंद्र शिंगाडे, माजी चेअरमन, कातरखटाव.टँकर सुरू केला जाईलप्रशासनाची आम्ही भेट घेतली आहे. त्यांनी आम्हाला लवकरात लवकर शिंगाडवाडीला व कातरखटाव परिसरातील अन्य वाडीवस्तीला टँकर देण्याचे आश्वासन दिले आहे. - तानाजी बागल, सरपंच, कातरखटाव