शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

श्रीमंती भपक्याने झाकोळला स्वार्थत्याग!

By admin | Updated: March 3, 2015 00:34 IST

माधव गाडगीळ यांची खंत : ज्ञानाची मक्तेदारी मोडणारा ‘अर्धा माणूस’ आधुनिक अर्थतज्ज्ञांकडून दुर्लक्षित

सातारा : ‘स्वार्थाची उपजत प्रवृत्ती हाच मानवी प्रगतीचा एकमेव आधार आहे, हे आधुनिक अर्थतज्ज्ञांचे प्रतिपादन अधुरे आहे. जनुकीयदृष्ट्या स्वार्थाबरोबरच स्वार्थत्याग हीसुद्धा उपजत मानवी प्रवृत्ती असून, स्वार्थासाठी ज्ञानावर मक्तेदारी प्रस्थापित करण्याचा मूठभरांचा प्रयत्न स्वार्थत्याग करणाऱ्यांनी नेहमीच उधळला आहे. श्रीमंती भपक्याने असे प्रयत्न झाकोळण्याचा प्रयत्न अर्थतज्ज्ञांकडून होत असला तरी ज्ञान आणि सत्य लपणार नाही,’ अशा शब्दांत ज्येष्ठ परिसरविज्ञान तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी अर्थशास्त्राच्या एकांगी मांडणीवर थेट प्रहार केला.मराठी पंधरवड्यानिमित्त मराठी साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि सातारा पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ह्या नच मुंग्या; हीच माणसे’ या विषयावर डॉ. गाडगीळ यांच्या व्याख्यानाचे आयोजन शाहू कला मंदिरात करण्यात आले होते. ‘वारूळपुराण’ या मुंग्यांवर आधारित आपल्या नव्या पुस्तकामागील प्रेरणेपासून सुरुवात करून डॉ. गाडगीळ यांनी उत्क्रांतीवाद, समाजकारण, अर्थकारण आणि राजकारणाच्या क्षेत्रात आपल्या नेमस्त परंतु ठाम भूमिकेतून सुमारे सव्वा तास मुक्त मुशाफिरी केली. माणसासारख्याच इतर समाजप्रिय प्राण्यांमधील स्वार्थ आणि स्वार्थत्याग, वात्सल्य आणि क्रौर्य अशा परस्परविरोधी भावभावनांचा जनुकीय अंगाने वेध घेताना, जितक्या स्वार्थी प्राणिजाती आहेत तितक्याच स्वार्थत्याग करणाऱ्या समाजप्रिय प्रजाती आहेत, असे त्यांनी सांगितले. साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी समुद्रतळाशी जीवसृष्टीला प्रारंभ करणाऱ्या बॅक्टेरियांपासून जगात आजमितीस अस्तित्वात असणाऱ्या सुमारे दहा लाखांहून अधिक प्रजातींचा धांडोळा घेतला असता, माणूस मुंग्यांप्रमाणेच समाजप्रिय असल्याचे सिद्ध होते, असे त्यांनी सांगितले.उत्क्रांतीवादाचे जनक चार्लस डार्विन यांच्या प्रतिपादनांचे दाखले देत माणसाच्या अंगी असलेले स्वजातीयांना ठार मारण्याचे क्रौर्य आणि त्याच्याच जोडीला असणारे वात्सल्य यांचा आधुनिक काळापर्यंतचा प्रवास त्यांनी विषद केला. ‘स्वार्थासाठी ज्ञानाची मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न वेदकाळातही झाला. परंतु बुद्धांनी ज्ञानाच्या मक्तेदारीला आव्हान दिले. अ‍ॅरिस्टोटल, सॉक्रेटिस, महावीर यांनीही तेच केले. आधुनिक काळात बिल गेट्ससारखे लोक ज्ञानाच्या मक्तेदारीचा प्रयत्न करीत आहेत तर विकीपीडियाचे सॉफ्टवेअर बनवून मोफत उपलब्ध करणारे वॉर्ड कनिंगहमसारखे लोक या मक्तेदारीला आव्हान देत आहेत. २००० मध्ये सामान्य लोकांच्या सहभागातून सुरू झालेला नि:शुल्क विकीपीडिया हा आज उत्कृष्ट मुक्त ज्ञानकोश ठरला आहे. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या व्यापारी तत्त्वावरील ज्ञानकोशाला त्याने आव्हान दिले. संपत्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धनाड्यांचे कौतुक अर्थतज्ज्ञांसह सर्वच करतात. परंतु धैर्याचे प्रदर्शन करून अन्यायाशी लढणारे दुर्लक्षित राहतात. तथापि, आर्थिक विषमता असली तरी ज्ञानाच्या बाबतीत विषमता यापुढे राहणार नाही. लोकांना अडाणी ठेवून, माहिती लपवून राज्य करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत,’ असा इशारा त्यांनी दिला.यावेळी वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर, विजय पाध्ये, ‘मसाप’ शाहूपुरी शाखेचे विनोद कुलकर्णी, किशोर बेडकीहाळ, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बाबर, नगरसेवक रवींद्र झुटिंंग, भाग्यवंत कुंभार उपस्थित होते. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)सेनापती बापटांचे काय?श्रीमंतीचा दिमाख हे माणसाच्या गळ्यातले लोढणे आहे असे सांगून डॉ. गाडगीळ म्हणाले, ‘मोरही केवळ लांडोरीला आकर्षित करण्यासाठी पिसाऱ्याचे ओझे सांभाळतो. उडता येत नसल्याने शिकारी प्राण्यांचे भक्ष्य ठरतो. माणसातही असाच दिमाख दाखविण्याची प्रवृत्ती आहे. टाटांनी मुळशी धरण बांधले तेव्हापासून त्यांच्या संपत्तीची चर्चा सुरूच आहे. परंतु मुळशी धरणात ज्यांनी जमिनी गमावल्या त्या शेतकऱ्यांचे आंदोलन उभे करणाऱ्या सेनापती बापटांचे काय?’‘संयुक्त महाराष्ट्र आंदोलनानंतर सुबोध मराठीची चळवळ सुरू झाली. मात्र, शासकीय पातळीवर मराठीच्या भल्याचे निर्णय कधी झालेच नाहीत. लोकांपर्यंत व्यवस्था लवकर पोहोचावी. परंतु राजकीय धुरिणांनी सुबोध मराठी दूर ठेवून माहिती लपविली, याचा मराठी भाषा पंधरवडा साजरा करताना खेद होतो,’ असा टोला गाडगीळ यांनी लगावला.