शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

फार्ममध्ये तळीरामांची पेरणी मद्यपींचा वावर वाढला : शेतकºयांच्या प्रशिक्षण स्थळावर वाढतोय राबता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:54 IST

सातारा : शेतकºयांना शेतातील विविध प्रयोग करण्यासाठी राधिका रस्त्यावर प्रतापसिंह शेती फार्मची निर्मिती करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत येथे तळीरामांचा वावर वाढला

ठळक मुद्दे शिक्षकही मुलांनो तिकडे बघू नका म्हणून विषय संपवतात; पण येथे बसलेल्या टोळक्याला कोणीही हुसकावत नाही, हे विशेष! दुपारी एकनंतर या परिसरात मद्यपींचा अड्डा जमतो. तीन-चारजणांचे टोळके गाड्यांवरून बाटल्या घेऊनच फार्ममध्ये एन्ट्री करते.

सातारा : शेतकºयांना शेतातील विविध प्रयोग करण्यासाठी राधिका रस्त्यावर प्रतापसिंह शेती फार्मची निर्मिती करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांत येथे तळीरामांचा वावर वाढला आहे. दिवसाढवळ्या या फार्ममध्ये चकण्यासह तळीराम ठाण मांडून बसत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळते.

येथील राधिका रोड मार्गावर जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असणाºया आणि काही एकरांत विस्तारलेल्या प्रतापसिंह शेती फार्ममध्ये शासनाच्या विविध योजनांतर्गत शेतीतील विविध प्रयोग केले जातात. सक्रियपणे येथे गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प, शेळीपालन प्रकल्प आदी प्रकल्प येथे सुरू आहेत. मात्र, पूर्वीइतका सामान्यांचा राबता या फार्मकडे दिसत नाही.त्याचे कारणही तसेच आहे. दुपारी एकनंतर या परिसरात मद्यपींचा अड्डा जमतो. तीन-चारजणांचे टोळके गाड्यांवरून बाटल्या घेऊनच फार्ममध्ये एन्ट्री करते. त्यानंतर झाडाच्या सावलीखाली त्यांचा डाव रंगतो. कागदातून बांधून आणलेला चकणा खात-खात, एक-एक घोट थेट बाटलीनेच मद्यप्राशन सुरू असते. मोठ्या आवाजातील गप्पा आणि सोबतीला उडत्या चालीची गाणी यामुळे त्यांना बारमध्येच बसल्याचा जणू आनंद मिळतो. सुमारे दोन ते अडीच तास येथे रंगीत संगीत पार्टी केल्यानंतर सर्व वस्तू तिथेच सोडून हे टोळकं गाड्या सुसाट वेगाने फार्मच्या बाहेर काढतात.

शेतीफार्ममध्ये काही कामानिमित्ताने येणाºयांना हा नजारा आता नित्याचाच बनला आहे. हे टोळकं कोणाच्या परवानगीने फार्ममध्ये येतं, येथे कोणत्या अधिकाराने पार्टी रंगवतं याविषयी कोणालाच काहीच माहिती नाही; पण त्यांचा थाट आणि रुबाब पाहून ते कोणाच्यातरी वशिल्यानेच येथे येत असावेत, अशी माहिती येथील एका कर्मचाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ ला सांगितले.शासकीय जागेचा होतोय गैरवापरप्रतापसिंह शेती फार्ममध्ये शेतीशी निगडित विविध प्रयोग केले जातात. येथे सुरू असलेला गांडूळ खत प्रकल्प पाहण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन मुलं येतात. काही शाळा तर येथे शैक्षणिक सहलही काढतात. नेमकं या सहली येथे आल्यानंतर येथे आलेल्या मुला-मुलींना हे प्रकार खूपच भयावह वाटतात. शिक्षकही मुलांनो तिकडे बघू नका म्हणून विषय संपवतात; पण येथे बसलेल्या टोळक्याला कोणीही हुसकावत नाही, हे विशेष! शासकीय जागेत बेकायदेशीरपणे घुसून तिथे मद्यप्राशन करणे गुन्हा आहे.; पण या टोळक्याला हटकवणं किंवा त्यांना येथे येण्यापासून मज्जाव करण्याचे धाडस अद्यापपर्यंत कोणीही केल्याचे दिसत नाही. शासकीय जागेचा होणारा गैरवापर थांबविण्याची मागणी होत आहे.सातारा येथील राधिका रोड रस्त्यावरील प्रतापसिंह शेती फार्ममध्ये दुपारच्या सुमारास तळीरामांची बिनदिक्कत अशी ओपन एयर पार्टी सुरू असते.