शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

बाजरी, सोयाबीनचा पेरा जास्त : खरिपाची पेरणी १०५ टक्के ; पावसामुळे भुईमुगाला अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:25 IST

जिल्ह्यातील पेरणी ७ आॅगस्टच्या आकडेवारीनुसार १०५ टक्के झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५२ हजार ८८ हेक्टर आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील भातावरही परिणाम

सातारा : जिल्ह्यात उशिरा पाऊस आल्याने खरीप हंगामातील पेरणीवर परिणाम होणार का? अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, सद्य:स्थितीत जिल्ह्यात १०५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये बाजरी आणि सोयाबीनची पेरणी व टक्केवारीही अधिक असून, पावसामुळे भुईमूग आणि भात लागणीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. तर त्यापूर्वी उन्हाळ्यात वळवाचा आणि मान्सूनपूर्व पाऊस बरसतो. त्यामुळे शेतकरी हे मान्सून सुरू होण्यापूर्वीच मशागतीची कामे करून बी-बियाण्यांची जुळवाजुळव करतो; पण यंदा वळवाचा पाऊसच झाला नाही. तर मान्सूनच्या पावसाने २० जूननंतर जिल्ह्यात प्रवेश केला. सुरुवातीला पूर्व आणि पश्चिम भागात चांगला पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना हायसे वाटले; पण त्यानंतर पूर्व भागाकडे पावसाने वक्रदृष्टी ठेवत पश्चिमेकडे जोरदार सुरुवात केली. परिणामी पूर्वेकडील पेरणी रखडणार, असे वाटत होते. तरीही शेतकऱ्यांनी असणाºया ओलीवर पेरणी उरकण्याचे काम केले. त्यामुळे जिल्ह्यातील पेरणी ७ आॅगस्टच्या आकडेवारीनुसार १०५ टक्के झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५२ हजार ८८ हेक्टर आहे. त्याहून अधिक म्हणजे ३ लाख ७० हजार ७४९ हेक्टरवर पेरा झालाय. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र ५३ हजार ७५० हेक्टर असून, प्रत्यक्षात ५९ हजार १९६ हेक्टरवर शेतकºयांनी हे पीक घेतलंय. त्यानंतर भाताचे क्षेत्र ५० हजार ८१७ हेक्टर असलेतरी आतापर्यंत ४१ हजार २६५ हेक्टरवरच लागण झालीय. हे प्रमाण ८१.२० टक्के इतके आहे. कºहाडला ८ हजार ९७७ पैकी फक्त ४ हजार ३२० हेक्टरवर लागण झाली आहे. बाजरीचे क्षेत्र तिसºया क्रमांकावर असून, ४९ हजार ५३१ हेक्टर क्षेत्र असलेतरी प्रत्यक्षात ५७ हजार १५५ हेक्टरवर पेरणी झालीय. बाजरी प्रामुख्याने माण, खटाव आणि फलटण तालुक्यात अधिक प्रमाणात घेण्यात येते.भुईमुगाच्या पेरणीवर पावसाचा परिणाम झाला आहे. कारण, पश्चिम भागात पावसाची संततधार राहिली, त्यामुळे शेतकºयांना वेळेत पेरणी करता आली नाही. भुईमुगाचे ४० हजार ४३० हेक्टर एवढे क्षेत्र निश्चित करण्यात आलं आहे. त्यापैकी ३३ हजार २३० हेक्टरवर पेरणी झाली असून, टक्केवारी ८२.१९ इतकी आहे.

सातारा तालुक्यात ७ हजार ४२१ पैकी २ हजार ९२९, पाटणमध्ये १७ हजार ५६८ पैकी १६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालीय. तर जावळी तालुक्यात सर्वसाधारणपणे २ हजार ९७४ हेक्टर क्षेत्र होते. तरीहीभुईमुगाची लागण ४ हजार ५८५ हेक्टरवर झाली. ही पेरणी अधिक ठरली आहे.जिल्ह्यात ज्वारीची पेरणी ६२.६४ टक्के झाली आहे. तर मका ७४.३६ टक्के, नाचणी ७४.९७, तूर ७४.५७, उडीद १०५.१४, मुगाची १५६ टक्के पेरणी झाली आहे.

पश्चिमेकडे नुकसानीची भीती...जिल्ह्यात पूर्वेकडे एकदम कमी पाऊस पडतो. तर पश्चिमेकडे पावसाळ्यात धुवाँधार असतो. यावर्षी पश्चिमेकडे पावसाने हाहाकार माजवला. तर पूर्वेकडे मात्र पावसाची दडीच आहे. त्यामुळे पूर्व भागातील पिकांसाठी पावसाची आवश्यकता आहे. तरच उत्पादन हाती येईल. पश्चिमेकडे मात्र सततच्या पावसाने पिकांचे नुकसान होणार आहे. तर काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्याने पीकही संपल्याची स्थिती आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfloodपूरFarmerशेतकरी