शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘दक्षिण’च्या मेळाव्यात ‘उत्तर’ची खदखद बाहेर

By admin | Updated: August 28, 2014 22:20 IST

राष्ट्रवादी काँग्रेस : यशवंत विकास आघाडीची पाठ, तर लोकशाही आघाडीत फूट

कऱ्हाड : विधानसभा निवडणुकीत ‘दक्षिणे’त काय भूमिका घ्यायची, यासाठी गाजावाजा करून घेतलेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव समर्थक नगरसेवकांसह लोकशाही आघाडीच्या काही नगरसेवकांनीही पाठ फिरवली़ दक्षिणचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात टाकत उत्तरेतील आरोप-प्रत्यारोपांची खदखद मात्र येथे बाहेर आली़ कऱ्हाड दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा येथील ‘पलाश मल्टिपर्पज हॉल’मध्ये झाला़ उत्तरेचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह कऱ्हाड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील, पांडुरंग चव्हाण, नंदकुमार बटाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ ‘दक्षिण’च्या या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीने खूप गाजावाजा केला होता; पण निमंत्रण पत्रिकेवर नाव असणाऱ्या उपनगराध्यक्ष राजेंद्र यादवांसह त्यांच्या सात नगरसेवकांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली़ यादव समर्थकही मेळाव्याकडे फिरकले नाहीत़ ज्यांच्या उमेदवारीसाठी हा खटाटोप सुरू आहे़ त्या लोकशाही आघाडीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या आघाडीतील ज्येष्ठ नगरसेवक, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्यासह पाच नगरसेवकही उपस्थित नव्हते. त्यामुळे लोकशाही आघाडीतील फूट आज प्रथमच चव्हाट्यावर आली़ मेळाव्यात अनेक वक्त्यांनी ‘कऱ्हाडसह पंधरा गावांचा दक्षिणेत समावेश झाला आहे़ आपली मोठी ताकद आहे़ सुभाष पाटलांना संधी द्या़ तुम्ही उत्तरेतून ४० हजारांनी निवडून आलात. सुभाष पाटलांना ८० हजारांनी निवडून आणू,’ अशी जोशपूर्ण भाषणे केली़ मात्र बाळासाहेबांनी आपल्या भाषणात ‘थोडा संयम धरा, आघाडीत अजून खटकाखटकी सुरू आहे़ ते मिटू द्या, मग पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो आपण घेऊ,’ असे सांगत ठोस निर्णय घेतलाच नाही; पण त्यांनी आपल्या भाषणातून उत्तरच्या राजकारणाची खदखद मात्र बाहेर काढलीच. यावेळी बोलताना आमदार पाटील आपल्या भाषणात म्हणाले, ‘उत्तर भागात शेतकऱ्यांच्या जमिनी लाटून आलेल्या पैशातून काहींचा स्वाभिमान अकस्मातपणे जागा झाला आहे़ तसेच काहीजण न झालेल्या विकासकामांचा गावोगावी गाड्या घेवून जाऊन डंका पिटू लागले आहेत़ उत्तरेत प्रचाराची पातळी घसरू लागली आहे़ आम्ही काही बोलत नाही याचा अर्थ आम्ही संयमी आहे, असा घेऊ नका गरज पडल्यास आम्ही जशास तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही़’ (प्रतिनिधी)