शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

मांढरगडावर घुमला ‘चांगभलं’चा गजर!

By admin | Updated: January 5, 2015 23:18 IST

काळुबाईची यात्रा : कडाक्याची थंडी, दाट धुक्यात तासनतास उभे राहून भाविकांनी घेतले दर्शन

मांढरदेव : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेव येथील श्री काळुबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी सोमवारी गर्दी केली होती. ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं’च्या गजराने मांढरगड दुमदुमला. शाकंभरी पौर्णिमेचा (पौष पौर्णिमा) दिवस असल्याने असंख्य भाविक गडावर दाखल झाले होते. मात्र, दरवर्षीच्या तुलनेत कडाक्याची थंडी आणि दाट धुके असल्याने भाविकांना दर्शनासाठी रात्रीपासूनच रांगा लावाव्या लागल्या.शाकंभरी पौर्णिमेच्या मुख्य दिवशी सकाळी सहा वाजता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश ए. पी. रघुवंशी व प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात आली. यावेळी देवीचे पुजारी काळुराम गुरव यांनी पौरोहित्य केले. महापूजेच्या वेळी देवीच्या दारातील प्रथम भाविक पांडुरंग सखाराम खोपडे व त्यांच्या पत्नी रत्नाबाई (रा. नाटंबी, ता. भोर, जि. पुणे, सध्या रा. मुंबई) यांना पूजेचा मान मिळाला. हे भाविक गेल्या सात वर्षांपासून देवीच्या यात्रेला नित्यनेमाने येतात. यावेळी पूजेसाठी तहसीलदार सदाशिव पडदुणे यांच्यासह अनेक मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.यात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी अनेक विभागांचे अधिकारी व कर्मचारी मांढरदेव येथे तळ ठोकून आहेत. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून अडथळ्यांची उभारणी केली आहे. कळसदर्शन मार्ग, छबिना किंवा देव्हारा मार्ग, चरणदर्शन मार्ग या वेगवेगळ्या रांगा असल्यामुळे भाविकांना सुलभ व लवकर दर्शन मिळत होते. काळुबाईचे दर्शन घेऊन भाविक सुखावत होता. देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. (वार्ताहर) विविध विभागांची पथकेआरोग्य विभागाची पथके, रुग्णवाहिका मंदिर परिसरात तैनात करण्यात आली होती. आजारी भाविकाला आरोग्यसेवा उपलब्ध होत होती.भाविकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता साठे आणि उपअभियंता एन. एस. पुजारी कर्मचाऱ्यांसमवेत प्रयत्नशील होते. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी, अन्न व औषध प्रशासन, पशुवैद्यकीय विभाग, अग्निशमन दल, ग्रामसेवक जी. डी. तळेकर, सरपंच काळूराम ाीरसागर व इतर विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होतेमंगळवारी मांढरगडवर भाविकांची गर्दी अधिक होण्याची शक्यता आहे. त्यासाठा प्रशासन सज्ज झाले आहे. भाविकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. देवीला गोडा नैवेद्यमांढरदेवला पशुहत्या करण्यास बंदी आहे. त्यामुळे लोक देवीला गोडा नैवेद्य दाखवत होते. त्यासाठी त्यांनी चुली पेटविल्या होत्या. दर्शन घेऊन माघारी फिरणारे लोक प्रसाद, देवीचे फोटो, गाण्यांच्या सीडी, खाद्यपदार्थ आदींची खरेदी करत होते.जादा कुमकयात्रेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, वीस अधिकारी, २५० कर्मचारी, जलद कृती दल तसेच वज्रपथक मांढरदेव येथे तैनात होते. पाल यात्रेत हत्ती बिथरल्यामुळे उडालेली धावपळ या पार्श्वभूमीवर जादा पोलीस कुमक मागविण्यात आली होती.तीन कारणांनी गर्दी कमीसोमवार हा मुख्य दिवस झाल्यानंतर लगेच मंगळवार असल्याने गर्दी तीन दिवसांत विभागली गेली.