शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

वडूजमधील सोनोग्राफी मशीन जप्त

By admin | Updated: June 11, 2014 00:57 IST

शितोळेंच्या रुग्णालयालाही सील : कऱ्हाडात व्हॅनमध्ये तपासणीचा संशय

सातारा : वडूज, ता. खटाव येथील डॉ. राजेंद्र शितोळे यांनी त्यांच्या नेत्र सोनोग्राफी सेंटरमधील मशीन कऱ्हाडमध्ये नेल्याचे उघडकीस आले असून भरारी पथकाने छापा टाकून सोनोग्राफी मशीन जप्त केले. तसेच वडूज येथील रुग्णालयाला सील ठोकले असून, काही कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.‘कऱ्हाड येथील शासकीय रुग्णालयासमोर एक व्हॅन उभी असून, त्या व्हॅनमध्ये सोनोग्राफी मशीन आहे,’ अशी माहिती वैद्यकीय भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकातील अधिकारी प्रकाश शिंदे, अरूणा बंडगर, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. पूनम साळुंखे यांच्यासह वडूजच्या वैद्यकीय अधीक्षक वर्षा डोईफोडे यांनी कऱ्हाडमध्ये छापा टाकला. त्यावेळी व्हॅनमध्ये सोनोग्राफी मशीन आढळून आले. ते या पथकाने जप्त केले.डॉ. राजेंद्र शितोळे यांचे वडूज येथे नेत्र सोनोग्राफी सेंटर आहे. असे असताना त्यांनी व्हॅनमधून सोनोग्राफी मशीन कऱ्हाडमध्ये नेल्याचे भरारी पथकाला आढळून आले. सोनोग्राफी मशीन परवानगीशिवाय दुसरीकडे नेणे कायद्याने गुन्हा आहे; त्यामुळे भरारी पथकाने वडूज येथील नेत्र सेंटरही सील केले आहे. तसेच या सेंटरमधून काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. डॉ. राजेंद्र शितोळे यांच्यावर कऱ्हाडमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)