कुडाळ : जावळी तालुक्यातील सरताळे ग्रामपंचायतीच्या झालेल्या सरपंच निवडणुकीत सोनाली पवार तर उपसरपंचपदी सुनील धुमाळ यांची बहुमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महेश कोन्हाळीकर यांनी काम पाहिले.
सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. सरपंच व उपसरपंच निवडीसाठी दोन अर्ज दाखल झाले होते. यामुळे निवडून आलेल्या सदस्यांनी मतदान केले. यामध्ये सरपंचपदी सोनाली पवार व उपसरपंचपदी सुनील धुमाळ यांची बहुमताने निवड जाहीर करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी पंचायत समिती माजी सदस्य शंकर पवार, माथाडीचे नेते वसंत पवार, कृष्णा ननावरे, माजी सरपंच लक्षण पवार, सुनील भिसे, तानाजी शिंदे, विशाल जाधव, राजेंद्र पवार, प्रकाश जाधव, लाला शिंदे, सर्जेराव चव्हाण आदी उपस्थित होते.