शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सोनगाव प्रकाशमय, ६५ कुटुंबीयांचा काळोख कायमचा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:16 IST

सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून मिनमिनत्या दिव्याखाली आपला संसाराचा गाडा चालविणाऱ्या तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपल्या घरी कधी वीज येईल, अशी कल्पनाही न करणाºया फलटण तालुक्यातील सोनगाव येथील ६५ कुटुंबियांच्या घरातील काळोख कायमचा दूर झाला आहे. या कुटुंबांना शासनाच्या सौभाग्य योजनेअंतर्गत मोफत वीजकनेक्शन मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.फलटण तालुक्यातील ...

सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून मिनमिनत्या दिव्याखाली आपला संसाराचा गाडा चालविणाऱ्या तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपल्या घरी कधी वीज येईल, अशी कल्पनाही न करणाºया फलटण तालुक्यातील सोनगाव येथील ६५ कुटुंबियांच्या घरातील काळोख कायमचा दूर झाला आहे. या कुटुंबांना शासनाच्या सौभाग्य योजनेअंतर्गत मोफत वीजकनेक्शन मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.फलटण तालुक्यातील सोनगावच्या वयोवृद्ध माने दाम्पत्याच्या चंद्र्रमौळी झोपडीत रॉकेलवर चालणारा मिणमिणता दिवा हाच रात्रीच्या अंधारात उजेडाचा एकमेव आधार होता. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना वीजजोडणी घेता आली नव्हती. मात्र महावितरणने सौभाग्य योजनेतून नुकतीच माने दाम्पत्यास मोफत वीजजोडणी दिली. आयुष्याच्या उत्तरार्धात विजेचा प्रकाश मिळाल्याने माने दाम्पत्याच्या घराबरोबरच त्यांचा चेहराही आनंदाने उजळून निघाला.फलटणपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर बहुसंख्य दलित वस्ती असलेलं पावणेचारशे उंबरठ्यांचं सोनगाव. शेतमजुरी हेच बहुतेकांच्या उदरनिवार्हाचं साधन. त्यामुळे काही घरांत स्वातंत्र्यानंतरही वीज पोहोचू शकली नव्हती. वीजजोडणी घ्यायची म्हटली तरी त्यासाठी पैसे आणायचे कोठून? असा यक्षप्रश्न अनेकांसमोर पडलेला. रॉकेलवर तेवणारी चिमणी अन् कंदिलाचा अंधूक प्रकाश हेच त्यांचं प्रारब्ध होतं.अशावेळी आसपासच्या घरांतले विजेचे दिवे पाहून आपल्याही घरात वीज असती तर किती बरं झालं असतं, असा विचार या दाम्पत्याच्या मनाला स्पर्शून जायचा; पण स्वप्न व सत्यात अडसर होता तो आर्थिक परिस्थितीचा. अशातच ११ एप्रिल २०१७ ची सकाळ त्यांच्या आयुष्यात स्वप्नपूतीर्ची आस घेऊन आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ जयंतीनिमित्त केंद्र सरकारने ग्रामस्वराज्य अभियानातून विजेपासून वंचित असलेल्या मागास नागरिकांना सौभाग्य योजनेतून वीज देण्याचा कार्यक्रम हाती घेतला. माने दाम्पत्यासह ६५ घरे वीजजोडणीपासून वंचित असल्याचे आढळून आले. यातील एकही घर अंधारात राहू नये म्हणून महावितरणने सोनगावात तीनवेळा लाभार्थ्यांच्या बैठका, भेटीगाठी घेतल्या. या लाभार्थ्यांना ५ मेपर्यंत वीजजोडणी देण्याची कालमर्यादा शासनाने निश्चित केली होती. परंतु सूर्यवंशी व त्यांच्या सहकाºयांनी रात्रीचा दिवस करत मुदतीपूर्वीच काम पूर्ण केले. तब्बल ११ नवीन खांब व तारा बसवून ६५ घरांत त्यांनी प्रकाश पोहोचविला.वायरिंग पूर्ण झाल्यानंतर यशोदा माने यांनी बटन दाबताच दिवसाही एलईडी दिव्याच्या प्रकाशाने घर उजळून निघाले. त्यांचा आनंदी चेहरा पाहून महावितरणच्या कर्मचाºयांनाही कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळाले.