शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सोनं रस्त्यावर सोडून ‘तिनं’ केला चोरट्यांचा पाठलाग

By admin | Updated: March 8, 2015 00:15 IST

भुर्इंज येथे रणरागिणीचा प्रताप : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महिलेचा थरारक प्रवास

भुर्इंज : ज्यांनी येरवडा जेल फोडून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उत्तुंग झेप घेतली, त्या क्रांतिवीर देशभक्त किसन वीर यांच्या नावाने वसलेल्या किसनवीरनगर (भुर्इंज) येथील सुवर्णा गायकवाड यांच्या गळ््यातील गंठण हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला. पण डॅशिंग गायकवाड यांनी आपले मंगळसूत्र चोरट्यांच्या हाती जाऊ दिले नाहीच उलट त्या चोरट्यांना पकडण्यासाठी जो थरारक प्रवास त्यांनी केला. किसनवीरनगर येथे राहणाऱ्या सुवर्णा गायकवाड यांचे सासर वाई तालुक्यातील लोहारे. सासरहून स्वत:ची दुचाकीवरून त्या परतत असताना वाईपासून काही अंतरावर शहाबागनजीक मागून आलेल्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या युवकाने त्यांच्या गळ््यातील गंठण हिसकावले. पण गायकवाड यांनी त्या चोरट्याचे हात पकडून आपले गंठण परत मिळविले. विशेष म्हणजे या सर्व घडामोडीत गायकवाड व चोरट्यांची दुचाकी चालूच होती. चोरट्यांचा प्रयत्न फसल्यानंतर गंठणचे पदक हातात घेऊन थांबलेल्या सुवर्णा गायकवाड काही क्षणच जागेवर थांबल्या. तोपर्यंत बाजूच्या रानात काम करणाऱ्या ऊसतोडणी मजूर व महिला धावत आल्या. हा सर्व प्रकार पाहणाऱ्या पाठीमागील एस. टी. तील चालकानेही गाडीही थांबवली. गायकवाड यांनी चोरट्यांचा जोशीविहीरपर्यंत पाठलाग केला. या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. तेथे चौकशी केली असता त्यांना समजले की, एस. टी. तील कोणीतरी घडल्या प्रकाराबाबत भुर्इंज पोलिसांना कळवल्याने सहायक पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी नाकाबंदी केली होती. त्यावर गायकवाड यांनी हा प्रकार आपल्या स्वत:च्या बाबतीत घडल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गायकवाड यांना त्यांची दुचाकी जोशीविहीर येथे थांबवून गाडीतून वाई येथे नेले. त्या प्रवासात वाटेत कुठे ते चोरटे दिसतात का, याचाही शोध घेतला. पोलिसांनी केलेल्या या सहकार्यामुळे गायकवाड यांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. सहायक पोलीस निरीक्षक गलांडे, पवार यांनी गायकवाड यांना पोलीस गाडीतून किसनवीरनगर येथे पोहोच करण्याची व्यवस्था केली. गंठणाचे मणी विखुरले चोरट्याच्या हातातून गंठण सोडवून घेताना ते तुटले आणि गंठणाचे मणी रस्त्यावर विखुरले होते. पण ऊसतोडणी मजूर महिलांना गायकवाड म्हणाल्या, ‘ते मणी तुम्ही घ्या, मी हे चोरटे कोण आहेत ते शोधायला जाते,’ असे सांगून त्या गेल्याही. चोरट्यांचा शोध घेत त्या जोशीविहीरपर्यंत आल्या. धाडसाचे कौतुक ही घटना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घडली. मणी जेव्हा रस्त्यावर सांडले तेव्हा ऊसतोडणी मजूर महिलांना ते मणी तुम्ही घ्या, असे सांगून चोरट्यांच्या पाठी धावणाऱ्या सुवर्णा गायकवाड याच्या धाडसाचे पोलिसांनीही कौतुक केले.