शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: आईचा खून केल्याप्रकरणी मुलास जन्मठेप; माझे लग्न का करत नाही याकारणावरुन डोक्यात घातले होते कुऱ्हाडीने घाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:23 IST

वडूज : मोराळे, ता. खटाव येथील किरण शहाजी शिंदे (वय ३२) याने माझे लग्न का करत नाही या कारणावरून ...

वडूज : मोराळे, ता. खटाव येथील किरण शहाजी शिंदे (वय ३२) याने माझे लग्न का करत नाही या कारणावरून आई कांताबाई शहाजी शिंदे (वय ५१) यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी मुलगा किरण शिंदे याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोलेसो यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, मोराळे ता. खटाव येथे गुरुवार, दि.११ डिसेंबर २०१९ रोजी रात्री साडेदहा मुलगा किरण शिंदे याने आई कांताबाई हिला म्हणाला, माझ्या मागच्या मुलांची लग्न झाली. तुम्ही माझे लग्न का करीत नाही, असे म्हणून वडील शहाजी शिंदे यांना घरातून लाथ मारून बाहेर काढले. घरास आतून कडी लावून आईला शिवीगाळ दमदाटी करून कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून आईचा खून केला. तसेच तुम्ही घराचा दरवाजा तोडून आत आल्यास तुमचाही खून करीन, अशी धमकी वडिलांना दिली. या घटनेची वडूज पोलिस ठाण्यात नोंद झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलगा किरण शिंदे याला अटक केली. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस. सी. गोसावी यांनी तपास करून वडूज न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि दहा साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने किरण शिंदे याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा सरकारी वकील अजित प्रताप कदम यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. हा खटला चालविण्याकामी उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित सावंत व पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रॉसिक्युशन स्काॅडचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, महिला पोलिस हवालदार विजयालक्ष्मी दडस, सागर सजगणे, अमीर शिकलगार व जयवंत शिंदे यांनी सहकार्य केले.