शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

पाणीप्रश्न सोडवा; मगच गुडमॉर्निंग पथक फिरवा!

By admin | Updated: October 30, 2015 23:21 IST

दुष्काळी जनतेचा संताप : पिंपोडे बुदु्रक, वाठार स्टेशन भागात कारवाई

वाठार स्टेशन : हागणदारीमुक्त गाव या संकल्पनेतून ग्रामीण भागात शौचालय वापराबाबत शासनाने जागृत भूमिका घेतली असून यासाठी कोरेगाव पंचायत समितीमार्फत गेल्या दोन दिवसांपासून गुडमार्निंग पथक कार्यरत करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात या पथकाने कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील पिंपोडे बुद्रुक गटात आसनगाव, सोनके, सोळशी, नांदवळ या गावातील ७ लोकांना पकडले व समज देऊन सोडून देण्यात आले. गुडमॉर्निंग पथकाने देऊर, पिंपोडे बुद्रुक, दहिगाव, तडवळे या गावांतील १६ जणांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात हजर केले. याच दरम्यान वाठार पोलिस ठाण्यात रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल आवळे यांनी पथकातील विस्तार अधिकारी घारे यांना या भागातील दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती देत आधी या भागाचा पाणीप्रश्न सोडवा मगच लोकांवर कारवाई करा, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने घारे यांनी तक्रार देण्याचे टाळले. पोलिसांनी सोळा जणांना समज देऊन सोडून दिले. शासन शौचालय बांधण्यासाठी जरी अनुदान देत असेल तरी मिळत असलेल्या अनुदानात शौचालय पूर्ण होत नाही. दुष्काळी भागातील गावांना शौचालयासाठी मुबलक पाणी देण्याचे काम ग्रामपंचायतींनी करावे, अशीच ग्रामस्थांची भूमिका आहे. (वार्ताहर)गेल्या वर्षी वाठारस्टेशनमध्ये गुडमॉर्निंग पथकावर सरपंचांनीच हल्लाबोल केला होता . यामागे गावचा पाणीप्रश्न हाच मुद्दा होता. याची पुनरावृती करण्याची वेळ आणू नये. पाणी प्रश्न सोडवा मगच कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर देण्याची आमची भूमिका राहील. - अमोल आवळे, जिल्हा उपाध्यक्ष, रिपाइं शासनाचा शौचालयसक्ती हा उपक्रम स्तुत्य आहे. आम्ही याचा आदर करतो; परंतु ज्या पध्दतीने गुडमॉर्निंग पथक या लोकांना दमदाटी व अरेरावी करत आहे, हे योग्य नाही. - संभाजी कदम, ग्रामस्थ, देऊर