फलटण : घरगुती वादातून पुतण्याने चुलत्याच्या पोटात चाकू भोसकून गंभीर जखमी केले. उपचार सुरू असताना जखमीचा मृत्यू झाला. हा प्रकार फलटण तालुक्यातील आसू येथे घडला. हणमंत कृष्णा सुतार (वय ५५) असे मृत चुलत्याचे नाव आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, भवानी विकास सोसायटीचे सचिव हणमंत कृष्णा सुतार हे सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घराजवळ उभे होते. त्यावेळी सख्खा पुतण्या अमोल रामचंद्र सुतार (३५) हा तेथे आला. त्याने चुलते हणमंत सुतार यांच्या पोटात चाकू भोकसून गंभीर जखमी केले. उपचारासाठी त्यांना बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना हणमंत सुतार यांचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, अमोल सुतार याला अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप तपास करीत आहेत.
सोसायटी सचिवाचा चाकूने भोसकून खून
By admin | Updated: April 5, 2016 00:51 IST