पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेणोली गावाजवळ सोनसळ ते शेणोली जाणाऱ्या रस्त्यावर २६ जानेवारी रोजी धुूस्टाईल चोरीची घटना घडली होती. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले होते. याबाबतचा गुन्हा कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल आहे. कऱ्हाड शहरातही गत काही दिवसांपासून धूमस्टाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक निरीक्षक विजय गोडसे यांच्यासह हवालदार सतीश जाधव, नितीन येळवे, जयसिंह राजगे, पोलीस नाईक संजय जाधव यांचे पथक तैनात करण्यात आले असून, धूमस्टाईल चोरांचा शोध त्यांच्याकडून सुरू आहे. त्यातच सोनकिरे (ता. कडेगाव) येथे धूमस्टाईल चोराची माहिती या पथकाला मिळाली. पथकाने तातडीने संशयिताला ताब्यात घेऊन अटक केली. त्याने शेणोलीतील गुन्ह्याची कबुली दिली असून, अन्य काही गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे.
शेणोलीतील गुन्ह्यात धूमस्टाईल चोरट्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:36 IST