शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पालिकेच्या घरकुल योजनेला झोपडपट्टीवासीयांचा विरोध

By सचिन काकडे | Updated: December 26, 2023 16:27 IST

सातारा : सातारा पालिकेच्या माध्यमातून करंजे पेठ येथे साकारण्यात येत घरकुल योजनेला मतकर झोपडपट्टीवासियांनी विरोध दर्शवला आहे. घरकुल योजनेसाठी ...

सातारा : सातारा पालिकेच्या माध्यमातून करंजे पेठ येथे साकारण्यात येत घरकुल योजनेला मतकर झोपडपट्टीवासियांनी विरोध दर्शवला आहे. घरकुल योजनेसाठी सात लाख रुपये आम्ही भरणार नाही आणि आमची जागाही सोडणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली असून, याबाबतचे निवेदन प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना देण्यात आले आहे.झोपडपट्टीवासीयांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी सातारा पालिकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना आकाराला येत आहे. १ हजार ९५८ सदनिका असणारा हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा घरकुल प्रकल्प आहे. लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रति सात लाख रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे. तशी कल्पना पालिकेकडून देण्यात आली होती. सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच पालिकेने योजनेचे काम हाती घेतले. प्रारंभी ही अट मान्यही करण्यात आली. मात्र आता काही झोपडपट्टीवासीयांनी सात लाख रुपये भरण्यास असमर्थता दर्शविली आहे.मंगळवारी दुपारी येथील बहुतांश नागरिकांनी पालिकेत धडक घेऊन मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात नमूद केले आहे की, झोपडपट्टीवासीय काबाडकष्ट करतात. त्यांना घरखर्च चालविण्यासाठी दररोज कसरत करावी लागते. सात लाख रुपये ही रक्कम त्यांच्यासाठी खूप मोठी आहे. बँकांमधून कर्ज घेतले तरी ते फेडताना अनेकांच्या नाकी नऊ येणार आहेत. कर्जावरील व्याजदरही अफाट आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासीय आहे त्या जागेवर सुखी आहेत. कोणालाही सात लाख रुपये भरून घरकुल नको. पालिकेच्या कोणत्याही अटी आम्हाला मान्य नाहीत. कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांबाबत पालिका प्रशासन काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर