शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

वाईत घुमला ‘जय शिवराय’चा नारा

By admin | Updated: April 22, 2015 00:29 IST

शिवजयंती उत्साहात : शिवज्योतीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत

वाई : शिवजयंतीनिमित्त वाई तालुक्यासह शहरातील शिवभक्तांनी प्रतापगड, रायगड, सिंधुदुर्ग, रायरेश्वर, पुरंदर, राजगड, तोरणा अशा किल्ल्यांवरून आणलेल्या शिवज्योतीचे वाईतील शिवाजी चौकात मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत करण्यात आले़ शहरातील प्रत्येक चौकात शिवभक्तांनी फ्लेक्स बोर्ड, स्वागत कमानी, रस्त्यांवर दुतर्फा भगवे झेंडे लावल्याने संपूर्ण शहरात शिवमय वातावरण झाले होते़ वाईच्या शिवाजी चौकात शिवसेनेचे आप्पा शिंदे, सागर मालुसरे, संदीप जायगुडे, बंडू शिंगटे व शिवभक्त येणाऱ्या प्रत्येक ज्योतीचे हार घालून व तेल वाहून स्वागत करीत होते़ शहरातील रविवार पेठेतील शिवजयंती मडंळ, वाई तालुका श्री छत्रपती शिवजयंती उत्सव मंडळ, गंगापुरी शिवजंयती मंडळ, सोनगिरवाडी शिवजयंती मंडळ, सिद्धनाथवाडी शिवजयंती मंडळ, मेणवली शिवजयंती मंडळ, व शेंदुजणे शिवजयंती मंडळ या मंडळांच्या ज्योतींनी वाईतील सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. रविवारपेठेतील सर्व शिवजयंती उत्सव मंडळांच्या ज्योतींचे हिंदू व मुस्लीम बांधवांनी स्वागत करून शिवप्रतिमेचे पूजन करून हिंदू-मुस्लीम एकतेचा संदेश दिला़ (प्रतिनिधी) पुसेसावळीत मिरवणूकपुसेसावळी : येथे शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे समािधस्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळजापूर येथून शिवज्योत आणण्यात आली. सुमारे ७० युवकांनी यात सहभाग घेतला होता. पुसेसावळीसह परिसरातील अनेक गावांमध्ये शिवज्योतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. पुसेसावळीत शिवजयंतीनिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंगळवार, दि. २१ रोजी सायंकाळी मिरवणुकीचा कार्यक्रम होणार आहे.