शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मजले बांधणारे हात देणार वृद्धांच्या आयुष्याला आकार

By admin | Updated: August 14, 2015 21:47 IST

आज उद्घाटन : ना नफा-ना तोटा तत्त्वावर मंगलमूर्ती केअर टेकर सेंटर-- गूड न्यूज

सातारा : घरातील ज्येष्ठ मंडळी पोटच्या मुलाला आणि सुनांना अडगळीतील वाटू लागतात. त्यांच्या आरोग्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केलं जातं. समाजातील ज्येष्ठ नागरिक व अनाथांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सातारा येथील बांधकाम व्यावसायिक सयाजी चव्हाण हे बंधू डॉ. जयदीप चव्हाण यांच्या मदतीने जेष्ठांचे आयुष्य सावरण्यास निघाले आहेत. त्यांच्या शिवविजय चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री मंगलमूर्ती केअर टेकर सेंटरचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनाच्या मंगलप्रसंगी सातारा येथे होत आहे. मजले बांधणारे हात वृद्धांच्या आयुष्याला आकरा देणार आहेत.पांढरा झप्पा कुर्ता, गळ्यात सोन्याच्या साखळ्या आणि डोळ्यावर काळा गॉगल घातलेला बिल्डर पाहिला की, तो सर्वसामान्यांना लुटणारच, स्वस्तात जागा घेऊन त्यावर घर बांधून पैसा कमावणार आहे, असा समज समाजात निर्माण झालेला आहे. हाच समज चुकीचा ठरविण्यासाठी सयाजी चव्हाण यांनी विडा उचलला आहे. बंधू डॉ. जयदीप चव्हाण यांच्या मदतीने ज्येष्ठ आणि अनाथांची काठी बनण्याचा संकल्प केला आहे.डॉ. जयदीप चव्हाण यांना श्री मंगलमूर्ती रुग्णालयाच्या माध्यमातून सातारकरांची सेवा बजावताना अनेक अनुभव आले. त्यातील काही चांगले होते, तर काही वाईट अंगावर काटा आणणारे होते. वाटेल तेवढे उच्च दर्जाचे उपचार करून आपण वृद्धांचा जीवनकाल वाढवत आहोत, ही चांगली बाब आहे. मात्र, केवळ उपचार म्हणजे सर्व काही आहे, असे नाही. उपचाराबरोबरच नंतरची सेवा सुश्रुषा व घरी द्यावयाची औषधे ही महत्त्वाची होऊन बसली आहेत. जुन्या आजाराचे रुग्ण रुग्णालयात ठेवणे परवडत नाही आणि वृद्धांची घरी सेवा करता येत नाही. यावर पर्याय म्हणून सातारा येथे मंगलमूर्ती केअर टेकर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.- सयाजी चव्हाणअनाथांसाठी विशेष सहकार्यएका जागेवर खिळलेल्या अनाथांच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विशेष सहकार्य करण्यात येणार आहे. या ठिकाणी चोवीस तास वीज, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, दररोज अंघोळीसाठी गरम पाणी, दररोज स्वच्छ कपडे, करमणुकीसाठी टीव्ही, वाचनालय असणार आहे. वर्षातून दोन वेळेला सहलही काढण्यात येणार आहे.