शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

वसाहत औद्योगिक; पण ‘उद्योग’ भलतेच!, सहा कोटींचे 'कोकेन' सापडल्याने कंपन्यांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात

By संजय पाटील | Updated: May 28, 2025 15:40 IST

काहींच्या मनात खोट, उद्योजकांना लागतेय गालबोट

संजय पाटीलकऱ्हाड : तासवडे, ता. कऱ्हाड येथील औद्योगिक वसाहत म्हणजे भांडवलदारांची अर्थवाहिनी. कष्टकरांच्या उपजीविकेचे साधन. आणि जिल्ह्याच्या उद्योगविश्वाचा भक्कम पाया. मात्र, खत कंपनीतील सहा कोटी 'कोकेन'च्या कारवाईने हाच पाया पुरता हादरला. मुळात ही वसाहत औद्योगीक; पण येथे चालणारे भलतेच ‘उद्योग’ आता चव्हाट्यावर आले असून वसाहतीतील इतर कंपन्यांचा कारभारही संशयाच्या भोवऱ्यात आला आहे.कऱ्हाडजवळच्या तासवडे औद्योगिक वसाहतीत उत्पादन, प्रक्रिया तसेच कच्चा आणि पक्का माल तयार करणाऱ्याअनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून वसाहतीत दररोज कोटींची उलाढाल होत असते. कंपन्यांमध्ये परप्रांतीयांसह अनेक स्थानिक कामगार कार्यरत आहेत. सध्या नव्याने काही कंपन्या येथे स्थिरस्थावर होत आहेत. तर काही कंपन्या वर्षानुवर्ष याठिकाणी सुरू आहेत.‘सुर्यप्रभा फार्माकेम’ ही कंपनी २०१७ साली येथे उभारली गेली. या कंपनीचा रासायनिक खत निर्मितीचा परवाना आहे. मात्र, प्रत्यक्षात खताबरोबरच येथे कोकेन तयार केले जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, असाच प्रकार या कंपनीत घडला आहे.मुळातच या औद्योगिक वसाहतीत असलेल्या अनेक कंपन्यांच्या कारभारावर कोणाचेच नियंत्रण नसल्याची परिस्थिती आहे. कंपनी व्यवस्थापनाकडे परवाना आहे का, त्या परवान्याचे नुतनीकरण केले आहे का तसेच ज्या कारणासाठी परवाना घेतला तेच काम त्या कंपनीत होतेय का, याची कसलीच शहानीशा होताना दिसत नाही. दुधासह फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग याठिकाणी आहेत.मात्र, त्याठिकाणी बनविल्या जाणाऱ्या पेय अथवा पदार्थाचा दर्जा, त्याच्यातील घटक, घटकांची गुणवत्ता, भेसळ याचीही तपासणी अपवाद वगळता केली जात नाही. ‘सुर्यप्रभा’मध्ये उत्पादीत झालेले कोकेन हे प्रशासनाच्या याच भोंगळ कारभाराचे तसेच कंपन्यांवर नसलेल्या नियंत्रणाचे द्योतक आहे, असे म्हणावे लागेल.

औद्योगिक वसाहतीत..

  • ४७२ : नोंदणीकृत कंपन्या
  • ३५३ : सुरू असलेल्या कंपन्या
  • ११९ : बंद स्थितीतील कंपन्या

पोलिसांचे केवळ रस्त्यावर पेट्रोलिंगतासवडेची औद्योगिक वसाहत तळबीड पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येते. मुळातच पोलीस ठाणे या वसाहतीपासून हाकेच्या अंतरावर आहे. मात्र, पोलीस केवळ पेट्रोलिंगपुरतेच वसाहतीत जातात. बाकी कंपन्यांच्या आतमध्ये रात्रंदिवस नेमके काय चालते, याची पाहणी कोणीही करीत नाही. वसाहतीचा विस्तार मोठा आहे. तसेच प्लॉटनुसार त्याचे वर्गीकरण करुन रस्ते तयार करण्यात आलेत. रात्री पोलिसांची जीप या रस्त्यावरुन गस्त घालते एवढेच.

कशाच्या किती कंपन्या?

  • १८ टक्के : कापड निर्मिती
  • २३ टक्के : अभियांत्रीकी
  • ११ टक्के : औषधे
  • १४ टक्के : दुध, फळप्रक्रिया
  • ६ टक्के : खत उत्पादन
  • २८ टक्के : इतर

चार गावांच्या जमिनीवर वसाहतकऱ्हाड उत्तरेतील तळबीड, वराडे, तासवडे आणि बेलवडे हवेली गावातील ग्रामस्थांच्या जमिनी घेवून औद्योगिक वसाहत उभारण्यात आली आहे. वसाहतीसाठी शेकडो एकर जमिन ग्रामस्थांकडून घेण्यात आली असून त्यावरच अनेक कंपन्या उभ्या राहिल्या आहेत..

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडMIDCएमआयडीसी