शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एकेरीचा बार अन् वाहनधारक बेजार..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:19 IST

सचिन काकडे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पोवई नाक्यावर सुरू असलेल्या ग्रेड सेरपेटरच्या कामामुळे पोलीस अधीक्षकांकडून शहरात एकेरी ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : पोवई नाक्यावर सुरू असलेल्या ग्रेड सेरपेटरच्या कामामुळे पोलीस अधीक्षकांकडून शहरात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. या निर्णयामुळे वाहतूक कोंडीची समस्या मिटण्याऐवजी त्यात आणखीनच भर पडू लागली आहे. हाकेच्या अंतरावर जाण्यासाठी वाहनधारकांना वळसा घालून जावे लागत आहे. हा निर्णय तूर्तास रद्द करावा, अशी मागणी वाहनधारक, व्यापाऱ्यांमधून होऊ लागली आहे.आठ रस्ते एकत्र जोडणाºया पोवई नाक्यावर गेल्या दीड वर्षापासून ग्रेड सेरपरेटरचे काम सुरू आहे. हे काम सुरू झाल्यापासून शहरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण वाढल्याने वाहनधारकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे ही परवड सुरू असताना शहरात पुन्हा एकदा एकेरी वाहतुकीच्या निर्णयावर अंमलबजावणी करण्यात आली आहे.ग्रेड सेपरटरमुळे वाहनधारक हैराण झाले असतानाच एकेरी वाहतुकीमुुळे त्यात आणखीनच भर पडली आहे. सध्या पोलीस मुख्यालय ते पाचशे एक पाटी, शेटे चौक ते कमानी हौद, शनिवार चौक ते देवी चौक, मोती चौक ते पोलीस मुख्यालय या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. पोलिसांकडून वाहतूक नियंत्रणाचे काम केले जात असले तरी या निर्णयामुळे अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत आहे. अंतर्गत रस्ते अरुंद असून एकाचवेळी दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा सुरू झाली आहे. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असून, वादावादीचे प्रकार घडत आहेत....तोवर निर्णय रद्द करावाग्रेड सेपरटेर व भुयारी गटार योजनेमुळे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसामुळे रस्त्यातील खड्ड्यांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या समस्येमुळे सातारकर त्रस्त झाले असताना आता एकेरी वाहतुकीमुळे अनेक समस्यांना सोमोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण होईपर्यंत एकेरीचा नियम रद्द करण्यात यावा, अशी प्रतिक्रिया व्यापारी तसेच वाहनधारकांमधून उमटत आहे.