शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

साध्या ड्रेसआड दडली वर्दी!

By admin | Updated: May 5, 2016 00:07 IST

ओळख लपविण्याचा प्रयत्न : दंड टाळण्यासाठी पोलिसांची शक्कल

सातारा : खाकी वर्दीला आता कायद्याचा ‘अभिनव’ आर्थिक फटका बसल्यामुळे वर्दी नको; पण दंड आवरा, अशी अवस्था पोलिस कर्मचाऱ्यांची झाली आहे. या दंडापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी वर्दीवर दुसरा शर्ट चढवून आपली ओळख लपवत नियमांचे उल्लंघन करण्याचा नवा फंडा कर्मचाऱ्यांनी पाडला आहे.सातारा पोलिस ठाण्यात सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काही पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी असल्यामुळे सामान्यांच्यापेक्षाही अधिक दंड भरलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना वाहतूक नियमांचे पालन करणे म्हणजे डोकेदुखी वाटत आहे. दुचाकीवर येणाऱ्या वाहतूक पोलिसांना दिवसभर हेल्मेट कुठे ठेवायचा हा प्रश्न सतावतो, तर जवळचाच प्रवास करायचा आहे, मग तेवढ्यासाठी सीट बेल्ट कशाला लावा, असा कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे. वास्तविक शहरातील रस्ते आणि त्यावरील गर्दीचा विचार केला तर सरासरी २० ते ३० या गतीने चारचाकी आणि तीस ते चाळीसच्या गतीने दुचाकी धावते. अशात मोठा अपघात होणं किंवा शारीरिक इजा होणं केवळ असंभव आहे, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.वाहतुकीचे नियम पोलिसांनी पाळून सामान्यांसमोर आदर्श ठेवावा, अशी अपेक्षा वरिष्ठांची आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांना हे नियम पाळणे बंधनकारक आहे. ‘मोडेन पण वाकणार नाही’ या उक्तीतील पोलिस कर्मचाऱ्यांना अजूनही हे नियम पाळणे पचनी पडेना. यावर उपाय म्हणून त्यांनी खाकी वर्दी दिसणार नाही याची आयडिया शोधून काढली. काही पोलिस ठाण्यातून बाहेर पडताना सामान्यांसारखा शर्ट किंवा जर्किन वर्दीवरून चढवून खाकी वर्दीची ओळख लपविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची पोलिस कर्मचारी असल्याची ओळख लपल्यामुळे पुढचे सगळेच अनर्थ टळत आहेत. सामान्य शर्टमध्ये चुकून वाहतूक पोलिसांनी पकडले तर त्याला तातडीने आपली खरी ओळख सांगून तिथून दंड न देता सटकण्याचा मार्गही काहींनी अवलंबला आहे. (प्रतिनिधी)