शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

"श्री सेवागिरी महाराज की जय"च्या जयघोषात 'श्री सेवागिरी महाराजां'चा रथोत्सव उत्साहात संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 16:37 IST

कोरोनाचे नियम पाळत भाविकांना रथाचे दर्शन घेता आल्याने भाविक भक्तांनी समाधान व्यक्त केले. "श्री सेवागिरी महाराज की जय"च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

पुसेगाव : महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता. खटाव) येथील प. पू. श्री. सेवागिरी महाराजांचा रथोत्सवाचा कार्यक्रम यात्रेचे धार्मिक विधी पूर्वापार प्रथेनुसार आणि रूढी व परंपरेनुसार साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाचे नियम पाळत भाविकांना रथाचे दर्शन घेता आल्याने भाविक भक्तांनी समाधान व्यक्त केले. "श्री सेवागिरी महाराज की जय"च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते  व आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे, ना. नितीन बानूगडे पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रथपूजन करण्यात आले. याप्रसंगी, मठाधिपती श्री. सुंदरगिरी महाराज, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन, विश्वस्त  व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, रथ व समाधी दर्शनास भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त केला होता. तसेच पुसेगाव शहर, मंदिरास जोडले गेलेले सर्व रस्ते बॅरिगेट्स लावून पोलीस प्रशासनाने बंद केल्याने वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला.गेल्या ७४ वर्षे  यात्रा सुरू झाल्यापासून सेवागिरी महाराजांची प्रतिमा व पादुका ठेवलेला, फुलांनी सजविलेला रथाच्या मिरवणुकीची परंपरा चालत आली आहे. मात्र, सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या साथीमुळे रथ मिरवणुकीसह यात्रेतही खंड पडला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर