शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाल येथील खंडोबा यात्रा रद्द, प्रमुख मानकऱ्यांसह पन्नास जणांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 17:50 IST

यात्रेचा सोहळा यू-ट्यूबवर प्रसारित करण्यात येणार आहे.

उंब्रज : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या कऱ्हाड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबाची १५ जानेवारी रोजी होणारी यात्रा जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली. दरम्यान, खंडोबाचे सर्व धार्मिक विधी, रुढी, परंपरा या स्थानिक पातळीवर खंडोबाचे प्रमुख मानकरी, कारखान्याचे मानकरी अशा फक्त पन्नास जणांच्या उपस्थितीत होणार आहेत. याबाबत प्रांताधिकारी यांनी आदेश काढला आहे.पाल येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचा १५ जानेवारी हा मुख्य दिवस आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मंगळवारी तातडीने बैठक घेतली. यात्रा रद्दचा निर्णय जाहीर केला. या बैठकीस खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड होते. सुरेश पाटील, सरपंच जयश्री पाटील, उपसरपंच सुनील काळभोर, मंडल अधिकारी युवराज काटे, धनवडे, यात्रा कमिटीचे चेअरमन प्रकाश जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत प्रशासन, विविध संस्थांचे आजी-माजी सर्व पदाधिकाऱ्यांनी यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे तसेच यात्रेचा सोहळा यू-ट्यूबवर प्रसारित करण्यात येणार आहे.यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणारे भाविक, मानकरी, मानाचे गाडे, सासनकाठी, पालख्या यांच्यासह भाविकांना यात्रेसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. या बैठकीस देवस्थानचे संचालक संजय काळभोर, सर्जेराव खंडाईत, तंटामुक्तीचे संजय गोरे, मंगेश कुंभार, जगन्नाथ पालकर, उत्तम गोरे, सचिन लवंदे, महेश पाटील, संजय गोरे, दिनकरराव खंडाईत, हरीष पाटील आदी उपस्थित होते. 

दि. १४ ते १९ जानेवारी अखेर व २३ जानेवारी रोजी श्री खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच दि. १४ जानेवारीपासून पाच किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता नागरिकांनी घ्यावी तसेच यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. -अजय गोरड, सहायक पोलीस निरीक्षक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKhandoba Yatraखंडोबा यात्राcorona virusकोरोना वायरस बातम्या