शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मसूरमध्ये सीसीटीव्ही बनलेत शोपीस, केवळ खांबावर भार : दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 15:40 IST

cctv, karad, sataranews मसूर येथील मुख्य चौकातील सीसीटीव्ही गत अनेक दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थ व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देमसूरमध्ये सीसीटीव्ही बनलेत शोपीस, केवळ खांबावर भार दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष

मसूर : येथील मुख्य चौकातील सीसीटीव्ही गत अनेक दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थ व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.मसूर ही परिसरातील सुमार ४० गावांची मुख्य बाजारपेठ आहे. दररोज येथे लाखो रुपयांची उलाढाल होत असते. परिसरातील हजारो लोकांची विविध कामासाठी येथे ये-जा सुरू असते. त्यातच सध्या दिवाळी सणासाठी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सजवली आहेत. विक्रीसाठी मालही मोठ्या प्रमाणात भरलेला आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे चालू असल्यास त्यांना भीती वाटत नाही. परंतु हे कॅमेरे बंद असल्याने व्यापारी भीतीच्या छायेत आहेत. या चौकातून पाटण-पंढरपूर मार्ग, कऱ्हाड-मसूर मार्ग, कऱ्हाड-किवळ असे मार्ग जात असल्याने याठिकाणी वाहनांची वर्दळ असते. सीसीटीव्हीमुळे सर्व ठिकाणाहून येणाऱ्या वाहनांवर लक्ष राहत होते. मात्र, सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे व्यापारी, ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.दरम्यान, गत चार दिवसांपूर्वी अंतवडी गावच्या शिवारात काही संशयास्पदरीत्या फिरत होते. ग्रामस्थांच्या सतर्कतेने संबंधितांना हकलण्यात आले आहे. विभागात काही दिवसात चोरीच्या घटना घडल्या नसल्या तरी यापूर्वी मुख्य चौकाच्या परिसरातील दुकानेच चोरट्यांनी टार्गेट केली होती. त्यामुळे येथे सीसीटीव्ही असणे अत्यंत आवश्यक आहे.

या चौकातून दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. तसेच किरकोळ वादावादीच्या घटना ही या चौकात घडत असतात. तसेच वाहन चोरीच्या घटनाही काहीवेळा घडल्या आहेत. मात्र सीसीटीव्हीमुळे काही घटनांची उकल झाली होती. संबंधित विभागाने येथील सीसीटीव्ही सुरू करून सर्वांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यापारी व ग्रामस्थांनी केली आहे.चाळीस गावांतील ग्रामस्थांची गर्दीमुख्य चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याबाबत वारंवार तक्रार करूनही हे कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून चालू केलेले नाहीत. सध्या दिवाळीमुळे खरेदीसाठी परिसरातील सुमारे चाळीस गावांतील ग्रामस्थांची गर्दी मसूर चौकात दिसून येते. त्यावरही सीसीटीव्हीचा वॉच असणे आवश्यक आहे.

टॅग्स :cctvसीसीटीव्हीSatara areaसातारा परिसरKaradकराड