शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या खरेदीसाठी अखेर बाजार पेठ फुलली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 22:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दिव्यांचा उत्सव आणि वर्षातला मोठा सण असलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी साताºयातील बाजारपेठ फुलली आहे. कपड्यांच्या दुकानांबरोबरच फराळाचे साहित्य, किल्ल्यावर ठेवायला खेळणी, पणती याबरोबरच घरगुती उपकरणे खरेदीसाठी सातारकरांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले आहे.दिवाळीच्या स्वागतासाठी गत सप्ताहापासून सातारनगरी सज्ज झाली होती. कपडे व्यापाºयांनी दिवाळीचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : दिव्यांचा उत्सव आणि वर्षातला मोठा सण असलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी साताºयातील बाजारपेठ फुलली आहे. कपड्यांच्या दुकानांबरोबरच फराळाचे साहित्य, किल्ल्यावर ठेवायला खेळणी, पणती याबरोबरच घरगुती उपकरणे खरेदीसाठी सातारकरांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले आहे.दिवाळीच्या स्वागतासाठी गत सप्ताहापासून सातारनगरी सज्ज झाली होती. कपडे व्यापाºयांनी दिवाळीचा ट्रेन्ड बघून त्यानुसार आधुनिक स्टाईलचे पेहराव बाजारपेठेत आणले आहेत. मात्र, शाळेला सुटी लागल्यानंतरच कपडे बाजारपेठ फुलणार, असा कयास व्यापारी व्यक्त करीत आहेत. शहरातील गोल बाग परिसरात पणत्या विक्रेते दाखल झाले आहेत. विविध आणि आकर्षक आकारातील पणत्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तीस रुपये डझनपासून पणत्या बाजारात उपलब्ध आहेत.दिवाळीच्या तिथीवर घरात आवश्यक असणाºया उपकरणांच्या बुकिंगसाठीही बाजारात सातारकरांची गर्दी दिसत आहे. वॉटर प्युरिफायर, आटा चक्की, मायक्रोवेव्ह, वॉशिंग मशीन, फ्रीज आदी घरगुती वस्तूंच्या पूर्व नोंदणीसाठीही गर्दी पाहायला मिळत आहे. किल्ल्यावर आवश्यक असलेली खेळणीही बाजारात दाखल झाली आहेत. शिवाजी महाराजांसह, जिजाऊ, संताजी-धनाजी, शिपाई, गवळणी मातीपासून तयार करण्यात आल्या आहेत.अभ्यासानंतर किल्लाबांधणीकडे लक्षशाळेत परीक्षा सुरू असल्यामुळे मुलं लवकर घरी येत आहेत. किल्ला तयार करण्यासाठी अभ्यासातून ही मुलं सूट मिळवत किल्ला बनविण्यासाठी धडपडत आहेत. रोज एक-एक वस्तू करत किल्ला बांधणीचे साहित्य मुलांनी आणले आहे. परीक्षेचा अभ्यास झाल्यानंतर मिळणाºया थोड्या वेळेतच सध्या किल्ला बांधणीचे दिव्य मुलांना पार पाडावे लागत आहे.