शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
'१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
3
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
4
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
5
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?
6
रियल इस्टेटचा 'खिलाडी' बनला अक्षय कुमार, २ अपार्टमेंटमधून केलेली बंपर कमाई; आता कोणाला कोट्यवधींना विकलं ऑफिस?
7
"हे आज धर्म, जात शिकवायला आलेत", 'फॅण्ड्री'मधल्या शालूने ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर
8
कोण होणार ख्रिस्ती धर्मीयांचा पुढचा पोप? ही पाच नावं शर्यतीत आघाडीवर
9
'चित्रपटगृह मिळालं नाही की, राज ठाकरेंकडे येणारे मराठी कलाकार का गप्प आहेत?', संदीप देशपांडेंनी दिला इशारा
10
मराठी अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर; शुभांगी अत्रेच्या Ex पतीचं निधन, अडीच महिन्यांपूर्वीच झालेला घटस्फोट
11
RBI नं १० वर्षांच्या वरील मुलांसाठी बँक अकाऊंटचे नियम बदलले, खातं उघडण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
12
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
13
भाजपाला शह देण्याची एकनाथ शिंदेंची रणनीती; नवी मुंबईतले १२ माजी नगरसेवक शिंदेसेनेत येणार
14
ज्येष्ठांसाठी बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
15
ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, आपत्कालीन स्लाइड्स वापरून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले
16
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
17
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
18
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
20
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण

धक्कादायक! कुटुंबावर गोळीबार; वडिलांसह मुलगी गंभीर

By संजय पाटील | Updated: December 27, 2024 23:48 IST

कऱ्हाडच्या सैदापुरातील घटना : पार्किंगच्या वादातून कृत्य; हल्लेखोर ताब्यात; पिस्तूल, सोळा काडतूस जप्त

(संजय पाटील, कऱ्हाड), लोकमत न्यूज नेटवर्ककऱ्हाड : सैदापूर येथील होली फॅमिली स्कूलमागे असलेल्या सोसायटीमध्ये शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एकाने कुटुंबावर गोळीबार केला. त्यामध्ये वडिलांसह दहा वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली. त्यानंतर हल्लेखोराने स्वतःला कोंडून घेतले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी सावधगिरी बाळगत शिताफिने हल्लेखोराला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह १६ जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत.

प्रदीप शंकर घोलप व श्राव्या शंकर घोलप अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी हल्लेखोर सुरेश काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैदापूर येथे होली फॅमिली स्कूलमागे ओम कॉलनीमध्ये अक्षरा गृहनिर्माण सोसायटी आहे. या सोसायटीत २० फ्लॅट असून प्रदीप घोलप हे सोसायटीचे अध्यक्ष आहेत. त्याच इमारतीत पहिल्या मजल्यावर सुरेश काळे हा कुटुंबासह राहण्यास आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रदीप घोलप हे सोसायटीच्या पार्किंगमध्ये आले. त्यावेळी सुरेश काळे याने दुचाकी वाटेतच लावल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सुरेश काळे याला दुचाकी व्यवस्थित बाजूला लावण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर प्रदीप घोलप आपल्या फ्लॅटमध्ये गेले. कुटुंबासह ते जेवण करीत असताना बेल वाजल्यामुळे प्रदीप यांनी दरवाजा उघडला. त्यावेळी सुरेश काळे दरवाज्यात उभा होता. मला तुमच्याशी बोलायचे आहे, असे म्हणून तो घरात घुसला. प्रदीप यांनी त्याला बसायला सांगितले. मात्र, अचानक त्याने स्वतःजवळील पिस्तूल काढून गोळीबार सुरू केला. त्यामध्ये प्रदीप घोलप व त्यांची मुलगी श्राव्या घोलप हे दोघेजण जखमी झाले.

घटनेनंतर आरडाओरडा झाल्यामुळे नागरिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्याचवेळी सुरेश काळे त्याच्या फ्लॅटमध्ये गेला. त्याने त्याच्या कुटुंबासह स्वतःला आतमध्ये कोंडून घेतले. काही वेळातच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक निरीक्षक राजेश माळी, उपनिरीक्षक निखिल मगदूम, हवालदार सागर बर्गे यांच्यासह पोलीस त्याठिकाणी पोहोचले. त्यांच्यासह नागरिकांनी जखमी प्रदीप घोलप व त्यांच्या मुलीला उपचारार्थ रुग्णालयात हलवले.

दरम्यान, सुरेश काळे याच्याकडे बंदूक असल्यामुळे पोलिसांनी सावधगिरी बाळगत त्याला पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे आवाहन केले. मात्र, तो दरवाजा उघडत नव्हता. अखेर पोलिसांनी विनंती करून त्याला दरवाजा उघडण्यास सांगितले. त्याने दरवाजा उघडताच पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखून त्याला ताब्यात घेतले. 

धान्याच्या डब्याखाली लपवली पिस्तूलसुरेश काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तो त्याच्याजवळील बंदूक कोठे आहे? याबाबतची कसलीही माहिती देत नव्हता. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. अखेर त्याला शांत करून पोलिसांनी घराची झडती घेतली असता धान्याच्या डब्याखाली पोलिसांना गावठी पिस्तूल आढळून आली. तसेच १६ जिवंत काडतूसही त्याठिकाणी आढळली. पोलिसांनी ती जप्त केली आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराड