शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 17:08 IST

सातारा : साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंगळवारी रात्री साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर ...

ठळक मुद्देप्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले रुग्णालयातप्रकृती स्थिर : वैद्यकीय तपासण्यांसाठी मुंबईत

सातारा : साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंगळवारी रात्री साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळीच त्यांना पुढील तपासणीसाठी मुंबईला नेण्यात आले. रक्तदाब वाढल्याने त्यांना त्रास झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आमदार शिवेंद्रसिंहराजेंना अस्वस्थ वाटू लागले. कुटुंबीयांनी त्यांना साताºयातील खासगी रुग्णालयात नेलं. रात्री उशिरापर्यंत शिवेंद्रसिंहराजेप्रेमी कार्यकर्त्यांची रुग्णालयाच्या परिसरात मोठी गर्दी होती. तर आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रकृती अस्वास्थ्याविषयी माहिती मिळताच माजी खासदार उदयनराजे भोसले मध्यरात्री रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपचार करणाºया डॉक्टरांशी चर्चा करून आरोग्याबाबत माहिती घेतली.दरम्यान, बुधवारी सकाळी अधिक तपासण्यांसाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले मुंबईला रवाना झाले. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांना सलग काही कार्यक्रमांना उपस्थित राहणं, त्याचबरोबर मतदारसंघातील कामांसाठी मुंबई दौरे करावे लागले. जावळी तालुक्यातील बोंडारवाडी धरणप्रश्नी दिवसभर आंदोलनातही ते सहभागी झाले होते. मंगळवारी फलटण येथे घरगुती कार्यक्रमासाठीही त्यांचा प्रवास झाला होता.

सलग येणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासामुळे दगदग झाल्याने त्यांना त्रास झाला असावा, असं वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. तथापि काळजीचे कोणतेही कारण नाही, असे शिवेंद्रसिंहराजेंच्या नजीकच्या सूत्रांनी सांगितले.

अस्वस्थ वाटल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर झाली. पहाटे त्यांच्या हृदयाची अँजिओग्राफी करण्यात आली असून, त्यांना हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा, हृदयाचा कोणताही गंभीर आजार आढळून आला नाही. त्यांची प्रकृती स्थिर असून, काळजीचं कोणतंही कारण नाही.- डॉ. सोमनाथ साबळे, हृदयरोग तज्ज्ञ, सातारा

मी सिनियर आहे...!माजी खासदार उदयनराजे भोसले यांना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच ते पुण्यातून थेट रुग्णालयात दाखल झाले. आमदार शिवेंद्रसिंहराजेंना बघताच, कायं झालंय तुम्हाला... लक्षात ठेवा मी सिनियर आहे... असं ऐकवलं. उदयनराजेंच्या या शब्दांमुळे काही क्षणांसाठी वातावरण भावनिक झालं. त्यानंतर त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना त्यांची काळजी घेण्याची आणि पथ्य पाळायला लावण्याची तंबी दिली. रुग्णालयातून बाहेर पडतानाही उदयनराजे यांचे डोळे पाणावले होते.

 

टॅग्स :Shivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेSatara areaसातारा परिसर