लोकमत न्यूज नेटवर्क
पेट्री : शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कुसुंबीमुरा, ता. जावळी येथे स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस व सैन्य भरतीचे मोफत मार्गदर्शन शिबिर उत्साहात झाले.
दुर्गम व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाविषयक योग्य मार्गदर्शन मिळून शासकीय सेवेत संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, स्पर्धा परीक्षांची व सैन्य भरतीविषयीचे मार्गदर्शन विक्रम तरडे यांनी केले. पोलीस भरतीबद्दलची माहिती निखील घोरपडे यांनी दिली.
कार्यक्रमावेळी शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष स्वप्नील धनावडे, सचिव शशिकांत चिकणे, जावली तालुकाध्यक्ष शिवाजी गोरे, सदस्य नवनाथ कोकरे, कुसुंबीमुरा येथील ग्रामस्थ ज्ञानेश्वर आखाडे, गणपत गोरे, श्रीरंग गोरे, श्रीरंग कोकरे, शंकर चिकणे, सांडवली, ता. सातारा गावचे रामचंद्र कोकरे तसेच आपटीमुरा, सांंगवीमुरा, कुसुंबीमुरा, कुडाळ, बामणोली, मोळेश्वर, एकीव, जुंगटी, सांडवली व इतर भागातील मुले, मुली बहुसंख्येने उपस्थित होते. शशिकांत चिकणे यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी गोरे यांनी आभार मानले.