सातारा : शहर परिसरात बिल्डर लॉबीने केलेले अतिक्रमण हटविले जात नसल्याचा आरोप करत शिवसेनेने शनिवारी या परिसरात आंदोलन केले.
या अतिक्रमणांबाबत पालिकेला वारंवार पत्र दिले. पोलिसांनाही कळविण्यात आले होते. मात्र, पालिका कोणतीही कारवाई करत नाही. साताऱ्यामध्ये बिल्डर लॉबीने अतिक्रमणे केली आहेत. पार्किंगची सोय नाही. सामान्य नागरिकांना मोठा त्रास होत आहे. बिल्डरांवर मेहरबानी का केली जात आहे. ऐतिहासिक मंगळवार तळ्याची भिंत पडली, तरी पालिकेला जाग येत नाही. मंगळवार तळ्याच्या रस्त्यावर जर गरीब भाजी विक्रेते बसले, तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र, बिल्डर लॉबीने पार्किंगची जागा सोडलेली नाही तसेच अतिक्रमण केले आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. याबाबत पालिकेकडे अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांवर कार्यवाही झाली नाही, तर शिवसेना तीव्र स्वरुपात आंदोलन करेल, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे.
फोटो नेम : सातारा येथील मंगळवार तळे परिसरात शनिवारी शिवसेनेतर्फे आंदाेलन करण्यात आले. (छाया : जावेद खान)
फोटो नेम : ११जावेद०१