शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सातारा लोकसभेवर शिवसैनिकांचा दावा, आढावा बैठकीत केली एकमुखी मागणी

By दीपक देशमुख | Updated: December 15, 2023 16:36 IST

२५ वर्षांपासून युतीच्या वाटपानुसार जागा शिवसेनेकडे

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघातून गेल्या २५ वर्षांपासून शिवसेना युतीच्या माध्यमातून लढत आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेलाच मिळावी, अशी सर्व शिवसैनिकांची एकमुखी मागणी असल्याचे मत सातारा लोकसभा मतदार संघाचे पक्ष निरीक्षक शरद कणसे यांनी व्यक्त केले. तर पुरुषोत्तम जाधव यांनीही युतीच्या वाटपात सातारा लोकसभेची जागा शिवसनेला होती आणि शिवसेनाच लढणार असल्याचे सांगितले.सातारा लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सहा विधानसभांचा आढावा घेण्यासाठी शरद कणसे सातारा दौऱ्यावर आले होते. या आढाव्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमख जयवंत शेलार, चंद्रकांत जाधव, रणजित भोसले, महिला आघाडीच्या शारदा जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.कणसे म्हणाले, युतीच्या माध्यमातून सातारा लोकसभा मतदार संघ शिवसेनेला सोडला आहे. त्यामुळे युतीच्या पारंपरिक पद्धतीनुसर २०२४ लाही सातारा संघ शिवसेनेच्या चिन्हावर लढला जावा, अशी पक्षातील सर्व शिवसैनिकांची मागणी आहे. याचा अहवाल आमच्या पक्षाच्या वरिष्ठांना देणार आहे. प्रत्येक पक्षातून सातारा लोकसभेसाठी मागणी होत असली तरी सर्वजण आपापल्या पक्षासाठी तशी मागणी करत आहेत. परंतू, सातारा लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाला पोषक वातावरण आहे. आतापर्यंत १५ ते १६ हजारापर्यंत सदस्य नोंदणी झाली असून आणखी ५० ते ६० हजारपर्यंत पक्ष सदस्य नाेंदणी करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत शिवसेना आग्रही आहे.उमेदवार कोण असेल याबाबत कणसे म्हणाले, सातारा लोकसभेसाठी पक्षात अनेक ताकदीचे उमेदवार आहेत. पक्षश्रेष्ठी चांगला चेहऱ्यास उमेदवारी देतील, असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला. फक्त पोटनिवडणुकीपुरती जागा सोडली, दावा शिवसेनेचाचपुरुषोत्तम जाधव म्हणाले, सातारा लोकसभा मतदार संघातून २५ वर्षंपासून शिवसेना लढत आहे. युतीच्या वाटपात हा मतदार संघ शिवसेनेकडे आहे. २०१९ च्या लोकसभेतही शिवसेनेतून माथाडी नेते नरेंद्र पाटील धनुष्यबाण चिन्हावर लढले होते. खा. उदयनराजेंनी राजीनामा दिल्यानंतर पोटनिवडणूक लागली. त्यावेळी सर्वानुमते ठरल्यानुसार जरी पोटनिवडणुकीसाठी ही जागा भाजपाला दिली तरी भाजपाचा हा मतदार संघ होत नाही. युतीच्या वाटपात ही जागा शिवसेनेचीच असून शिवसेनाच लढणार, असा दावा पुरुषोत्तम जाधव यांनी केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाShiv Senaशिवसेना