सातारा : छत्रपती शिवरायांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या सातारानगरीत शुक्रवारी शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने प्रमुख रस्ते, चौकाचौकात भगव्या कमानी लावण्यात आल्या आहेत. चौकाचौकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून अभिवादन करण्यात आले. पोवई नाक्यावरील शिवरायांच्या पुतळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.किल्ले प्रतापगडावरही शिवजयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह विविध विषय समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतापगडावर शिवरायांना अभिवादन केले. शिवजयंतीनिमित्ताने काही शिवप्रेमींनी अनेक गडावरुन शिवज्योत आणली होती.शिवजयंती उत्साहात साजरी केली जात असली तरी प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात येत होते. कोठेही गर्दी झालेली दिसत नव्हती.
सातारा जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 13:20 IST
Shivjayanti Satara- छत्रपती शिवरायांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या सातारानगरीत शुक्रवारी शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्ताने प्रमुख रस्ते, चौकाचौकात भगव्या कमानी लावण्यात आल्या आहेत. चौकाचौकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवून अभिवादन करण्यात आले. पोवई नाक्यावरील शिवरायांच्या पुतळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
सातारा जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी
ठळक मुद्देसातारा जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरीशिवप्रेमींनी अनेक गडावरुन आणली शिवज्योत