शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

शिंदे, रामराजेंना कॉँग्रेसचा झटका!

By admin | Updated: September 13, 2014 00:02 IST

निषेधाचा ठराव : ‘आधी स्वत:च्या तालुक्यातील आकडेवारी बघा, मग दुसऱ्यांची चिंता करा !’

सातारा : ‘रामराजे वयाने मोठे असले तरी राजकारणातील माझे वय त्यांच्यापेक्षा अधिक आहे. युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना मीच त्यांच्या भावाला सभापती केले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत बोलताना त्यांनी प्रत्येक शब्द जपून वापरावा,’ असा जोरदार पलटवार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. आनंदराव पाटील यांनी केला, तर ‘स्वत:च्या फलटणमध्ये विधानसभेला काय होणार, इकडं नीट लक्ष द्या. उगाचच आमच्या कऱ्हाड दक्षिणची काळजी करू नका,’ असा खणखणीत टोलाही अविनाश नलवडे यांनी रामराजेंना लगावला. ‘कऱ्हाड दक्षिणमध्ये मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीची ताकद दाखवावीच लागेल’, असे विधान काल, गुरुवारी रामराजे यांनी केले होते, तर ‘काँग्रेसकडून कुरघोडी झाली तर राष्ट्रवादी तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर देईल,’ असा सज्जड दम मंत्री शशिकांत शिंदे यांनी दिला होता. रामराजे आणि शिंदे यांच्या या वक्तव्यांची दखल जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज, शुक्रवारी गंभीरपणे घेतली. काँग्रेस भवनात तातडीने बोलाविण्यात आलेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांवर जोरदार आगपाखड केली.काँग्रेस पदाधिकारी पहिल्यांदाच आक्रमक झाले होते. बैठकीत मंत्री शिंदे आणि रामराजे यांच्या निषेधाचा ठराव विजयराव कणसे आणि भीमराव पाटील यांनी मांडला. त्याला मोहन जाधव आणि अविनाश नलवडे यांनी अनुमोदन दिले. यावेळी आनंदराव पाटील म्हणाले, ‘रामराजे आणि शिंदेंनी मुख्यमंत्र्यांची काळजी करू नये. ते कऱ्हाडमधून लढणारच आहेत. मात्र, या दोन मंत्र्यांना बाबांची खूपच काळजी वाटत असेल तर त्यांच्यापैकी एकाने येथून लढूनच दाखवावे; कारण त्या दोघांचीही कामे आणि कर्तबगारी आम्हाला चांगली ज्ञात आहे. ’ (प्रतिनिधी)