शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोयना प्रकल्पग्रस्तांचा शासनाच्या नावाने ‘शिमगा’ : आंदोलनस्थळीच होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 22:44 IST

कोयनानगर : कोयना प्रकल्पग्रस्त आता करो या मरो या भूमिकेत असून, गुरुवारी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनस्थळीच होळीचा सण साजरा केला.

कोयनानगर : कोयना प्रकल्पग्रस्त आता करो या मरो या भूमिकेत असून, गुरुवारी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनस्थळीच होळीचा सण साजरा केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या नावाने अक्षरश: ‘शिमगा’ करीत बोंब ठोकली.

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाकडे जिल्हाधिकारी अथवा तहसीलदारांनीही पाहिलेले नाही. त्यांनी या आंदोलनाची कसलीच दखल घेतली नाही. शासनाकडून होत असलेली अवहेलना आणि राज्यकर्त्यांकडून होणारे वेळकाढू धोरण यामुळे गेल्या ६४ वर्षांत येथील जनता वैतागून गेली आहे. प्रकल्पग्रस्तांनी सुरुवातीला सातारा आणि नंतर कोयनानगर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. धरणग्रस्त हजारोच्या संख्येने या आंदोलनास बसले आहेत. मुख्यमंत्र्यांना नदीकाठी गाण्याच्या तालावर नाचायला वेळ आहे; पण आम्हा प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मुंबईहून आलेले चाकरमानीही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

कोयना प्रकल्पाचे सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता कुमार पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन चर्चा केली. मागण्यांचे प्रस्ताव त्वरित शासनस्तरावर पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी डॉ. भारत पाटणकर यांच्यासह आंदोलकांनी आंदोलनस्थळी होळी साजरी केली. तसेच शासनाच्या नावाने ‘बोंब’ ठोकली. यावेळी महिलांनी होळीची गाणी म्हटली. ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा,’ ‘धरण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,’ यासारख्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. होळीचे सर्व कार्यक्रम आंदोलकांनी विधिवत आंदोलनस्थळी साजरे केले. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे हरिश्चंद्र दळवी, विठ्ठल सपकाळ, संजय लाड, परशुराम शिर्के , सीताराम पवार, चैतन्य दळवी, महेश शेलार, सचिन कदम, दाजी पाटील, श्रीपती माने, डी. डी. कदम, शिवाजी साळुंखे, संभाजी चाळके यांच्यासह हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.‘द्रुष्ट प्रवृत्ती नष्ट करा’ म्हणत पेटवली होळीदेशभर होळीचा सण उत्साहात साजरा होत असताना ज्यांच्या त्यागाने शहर व गावे उजळून निघाली त्या प्रकल्पग्रस्तांना मात्र हा सण आंदोलनस्थळी साजरा करावा लागला. त्यांची होळी कोयनामाईच्या काठावर भाकरीच्या शोधासाठी व फाटलेला संसार जोडण्यासाठी साजरी झाली. धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्त यांच्या जीवनात अंधकार, दु:ख, दारिद्र्य निर्माण करणाºया द्रुष्ट प्रवृत्ती या होळीत जाळून नष्ट करा, अशा आशयाची मागणी करत आंदोलनस्थळी होळी पेटवण्यात आली.कोयनानगर, ता. पाटण येथे प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनस्थळीच होळी पेटवून शासनाच्या नावाने शिमगा केला.