शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शिखर शिंगणापूरच्या मुख्य मंदिरावर ध्वज, शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त लगबग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 23:16 IST

शिखर शिंगणापूर येथील शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिरापासून अमृतेश्वर मंदिराच्या कलशापर्यंत ध्वज बांधण्याचा कार्यक्रम रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.

दहिवडी (सातारा ) : शिखर शिंगणापूर येथील शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिरापासून अमृतेश्वर मंदिराच्या कलशापर्यंत ध्वज बांधण्याचा कार्यक्रम रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. हर..हर महादेवच्या जयघोषाने शिंगणापुरातील वातावरण भक्तिमय झाले होते.श्री शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवारी मानाचे पागोटे बांधण्याचा कार्यक्रम पार पडला. महादेवाचे मुख्य मंदिर ते अमृतेश्वर (बळी) मंदिराच्या कलाशापर्यंत ध्वज बांधण्यात आला. मराठवाड्यातील आपेगाव व औसगाव (ता. कळस, जि. उस्मानाबाद) येथील साळी व कोष्टी समाजाला यंदा ध्वज बांधण्याचा मान मिळाला.रविवारी दुपारी ध्वजाचे आगमन झाले. यानंतर वाजत-गाजत ध्वज मंदिर परिसरात आणण्यात आला.ध्वजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. हा साहसी सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील हजारो भाविकांनी शिंगणापुरात हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर रात्री बारा वाजता शिव-पार्वती विवाह सोहळा पार पडतो. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी शिंगणापूर येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.अशी आहे प्रथाध्वज म्हणजे देवाचे मानाचे पागोटे. या पागोट्याला देवाचे वस्त्र म्हणूनही संबोधले जाते. सुमारे दीडशे मीटर लांबीचे हे वस्त्र विणण्याचे काम मानकरी वर्षभर करत असतात. या वस्त्राची गुढीपाडव्याला पूजा करून मानकरी हे वस्त्र शिखर शिंगणापूरला घेऊन येतात. यानंतर ध्वज बांधण्याचा कार्यक्रम पार पडतो.असा बांधलो जातो ध्वजप्रारंभी शिव मंदिराला ध्वजाचे एक टोक बांधले जाते. त्यानंतर हा ध्वज दोन्ही मंदिरांच्या मध्यावर आणला जातो. ध्वजाचे दुसरे टोक अमृतेश्वर मंदिराच्या कळसापर्यंत कासऱ्याने खेचले जाते. तीन-चार व्यक्ती हा ध्वज वर खेचून घेतात. ध्वज बांधण्याची कसरत दोन तास चालते. ध्वज सुटू नये, याशिवाय मंदिरावरून खाली येऊ नये, याची दक्षता घेतली जाते. हा ध्वज उतरला की यात्रेचा समारोप होतो.