शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

सावली फाउंडेशनने दिले मातंग वस्तीला स्वच्छ पाणी!

By admin | Updated: June 4, 2015 00:03 IST

कातरखटाव येथील घटना : खासगी कूपनलिकेचा मालक विनामूल्य पुरवतोय पिण्याचे पाणी--- गूड न्यूज

विठ्ठल नलवडे - कातरखटाव  -येथील मातंग वस्ती गेल्या तीन महिन्यांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरी जात आहे. वस्तीची अडचण लक्षात घेऊन येथील सावली फाउंडेशनने त्यांच्यासाठी मोफत पाण्याच्या टँकरची सोय केली आहे.कातरखटाव गावात अंतर्गत नळाद्वारे पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे. पाणीयोजनेची पाईपलाईन मातंगवस्तीला पहिल्यापासून जोडली गेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिला ठिकठिकाणी पायपीट करत होत्या. पंधरा टक्के अनुदानातील मागासवर्गीयांना शासनाकडून मिळणारे डबे पाणीपट्टी भरल्याशिवाय पाणी दिले जाणार नाही, असे ग्रामपंचायतीने सांगितले होते. कातरखटावपासून अर्ध्या किलोमीटरवर असणाऱ्या मातंगवस्तीला आतापर्यंत स्थानिक बोअरचा आसरा होता. बोअरच्या पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे मातंग वस्तीवरील महिला व ग्रामंस्थाची पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी तीन महिने त्रेधातिरपीट सुरू आहे. कडक उन्हाळा संपत आल्यानंतर मे महिन्याअखेरीस ग्रामपंचायतीद्वारे शासनाने येरळा धरणातील न फिल्टर केलेला शेवाळलेल्या पाण्याचा टँकर पाठवला. हे पाणी घेण्यास मातंग वस्तीच्या महिला व ग्रामस्थांनी नकार दिला. शेवाळलेले, चिकट, अशुध्द पाणी आम्हाला नको आहे, असे येथील महिलांनी सांगितले.पाणीपट्टी समान लावणारे आणि पाणीपुरवठा करताना आस्था न दाखवणाऱ्या गावाने वर्षातून किती महिने मातंग वस्तीला पाणी पुरवले व पाणीपट्टी कोणा-कोणाची वसूल केली, असा सवाल पोपट मोरे यांनी उपस्थित केला आहे. मातंग वस्तीतील हा प्रकार समजल्यानंतर सावली फाउंडेशनने पुढाकार घेऊन खासगी बोअरचे पाणी सुरू केले. रोज नियमितपणे या वस्तीला विनामोबदला पाण्याचे वाटप केले जात आहे. काही दिवसांपूर्वी येरळा धरणातील शासकीय पाण्याचा टँकर आम्ही मातंग वस्तीला देण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी ‘आम्हाला गढूळ पाणी नको आहे. आमची पोरंबाळं आजारी पडतील, टँकर खाली करायचा नाही,’ असे सांगितले. महिला व मातंग वस्तीमधील ग्रांमस्थानी टँकर परत पाठविला. काही शासकीय अडचणीमुळे टँकर उशिरा मिळाला असला तरी वाड्या-वस्त्यानां सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. राजेंद्र बागल, सरपंच, कातरखटाव गेली चार महिने मातंग वस्तीमधील महिला व ग्रामस्थ पिण्याच्या व वापराच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. अशा वेळी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष का? या गंभीर परिस्थितीची जाण ठेवून गावातील खासगी मालक स्वत:च्या बोअरचे पाणी गेली दीड महिन्यापासून मातंग वस्तीला पुरवत आहेत. पाणी न देता गोरगंरीबांकडून पाणीपट्टी वसूल करण्यापुरती ग्रामपंचायत आहे का? मातंग वस्तीला दिलेली ही वागणूक लोकशाहीत अयोग्य आहे.पोपट मोरे, ग्रामस्थ, कातरखटाव व माजी सभापती