शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

गोरगरीब ज्येष्ठांना शरयू, गंगास्नानाचा लाभ!

By admin | Updated: October 8, 2015 21:59 IST

काशीयात्रा करण्याची स्वप्ने उतारवयात अनेकांना असतात; पण त्यांना ती पूर्ण करता येत नाहीत. अशा ५० ज्येष्ठांना दरवर्षी अयोध्या आणि काशीचे दर्शन मोफत घडविण्याचा संकल्प ननावरे कुटुंबीयांनी सोडला.

लोणंद : धर्मपरायण बंधूंच्या स्मृती जपण्यासाठी लोणंदच्या (ता. खंडाळा) ननावरे कुटुंबीयांनी अनोखा मार्ग शोधला. दिवंगत प्रमोद लक्ष्मण ननावरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ९० ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी अयोध्या, काशीयात्रेचे भाग्य लाभलंय. दरवर्षी किमान ५० ज्येष्ठांना अशी यात्रा घडविण्याचा त्यांचा निर्धार आहे.देवाधर्माची आवड सर्वांनाच असते. धार्मिक स्थळांना भेट देऊन दर्शन घ्यावेसे वाटते. पवित्र नद्यांमध्ये स्नान करावेसे वाटते; पण अनेकांना ही संधी केवळ खिसा रिकामा असल्यामुळे मिळत नाही. गावाजवळून वाहणाऱ्या नदीलाच मग ‘गंगा’ मानले जाते. जीवनाचा पूर्वार्ध पोटामागे धावण्यात निघून जातो आणि उत्तरार्धातही मनाप्रमाणे धर्मक्षेत्री जाण्याची संधी मिळत नाही. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्येष्ठांची वेदना ननावरे कुटुंबांनी जाणली. प्रभू रामचंद्रांचे जन्मस्थान असणाऱ्या अयोध्येचे दर्शन आणि सर्वाधिक पुण्यप्रद मानली जाणारी काशीयात्रा करण्याची स्वप्ने उतारवयात अनेकांना असतात; पण त्यांना ती पूर्ण करता येत नाहीत. अशा ५० ज्येष्ठांना दरवर्षी अयोध्या आणि काशीचे दर्शन मोफत घडविण्याचा संकल्प ननावरे कुटुंबीयांनी सोडला. या ५० जणांचा प्रवास, निवास आणि भोजनाची व्यवस्था करायला त्यांनी सुरुवात केली. परंतु प्रतिसाद वाढत गेला आणि तो लक्षात घेऊन ननावरे कुटुंबीयांनी ९० जणांची व्यवस्था केली आणि ही यात्रा सुरू झाली.आपले दिवंगत थोरले बंधू प्रमोद ननावरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रवीण आणि प्रकाश ननावरे या दोन बंधूंनी धर्मसेवेचे व्रत घेतले आहे आणि गोरगरीबांना तीर्थयात्रा घडविण्यामधून धर्मसेवेबरोबरच मानवसेवाही त्यांच्याकडून घडत आहे. (प्रतिनिधी)तीन लाखांहून अधिक खर्चयावर्षी तीर्थयात्रेला गेलेल्या ९० ज्येष्ठ नागरिकांची संपूर्ण व्यवस्था करण्यासाठी प्रतीमाणशी साडेतीन हजार रुपये खर्च ननावरे कुटुंबीयांनी अपेक्षित धरला आहे. यावर्षी पहिलीच यात्रा असल्याने अंदाजापेक्षा अधिक खर्च होऊ शकतो. मात्र, साडेतीन हजारांच्या हिशोबानेही या यात्रेचा खर्च सव्वातीन लाखांच्या घरात पोहोचतो. आमच्या थोरल्या बंधूंचा स्वभाव शांत होता. ते धार्मिक वृत्तीचे होते. समाजात त्यांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी आम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्येष्ठांना काशी, अयोध्या, प्रयागयात्रा मोफत घडविण्याचा उपक्रम कुटुंबीयांच्या वतीने दरवर्षी राबविणार आहोत. - प्रवीण ननावरे, लोणंदज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा घडविण्याचा ननावरे बंधूंचा उपक्रम स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. समाजाप्रती असलेल्या बांधीलकीची जाणीव ठेवून अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी हाती घेतले असून, ही बाब कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.- विनोद क्षीरसागर, माजी सभापती, पंचायत समिती खंडाळाननावरे यांचे तीर्थाटनज्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही यात्रा आयोजित केली आहे, ते दिवंगत प्रमोद लक्ष्मण ननावरे धार्मिक वृत्तीचे तर होतेच; शिवाय त्यांनाही तीर्थाटनाची मोठी आवड होती. देशभरातील अनेक तीर्थस्थळांना त्यांनी भेटी दिल्या होत्या. चारधाम यात्रेबरोबरच धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ते दर्शन घेऊन आले होते.