शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
3
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
4
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
5
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
6
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
7
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
8
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
9
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
10
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
11
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
12
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
13
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
14
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
15
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
16
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
17
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
18
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
19
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
20
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका

शिरवळमध्ये पत्रकारावर प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:54 PM

शिरवळ : शिरवळ येथील ‘लोकमत’चे पत्रकार मुराद पटेल (वय ३२) यांच्यावर गुरुवारी रात्री अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या ...

शिरवळ : शिरवळ येथील ‘लोकमत’चे पत्रकार मुराद पटेल (वय ३२) यांच्यावर गुरुवारी रात्री अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, शिरवळ येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, पत्रकार मुराद पटेल हे गुरुवारी (दि. ११) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमरास आपली दैनंदिन कामे आटोपून घराकडे निघाले होते. सटवाई कॉलनी येथील मदरसाजवळ त्यांची दुचाकी आली असता अंधारात दबा धरून बसलेल्या अज्ञात सहा हल्लेखोरांनी मुराद पटेल यांच्या दुचाकीसमोर आपली दुचाकी आडवी लावली. यानंतर त्यांनी काही समजण्याच्या आतच मुराद पटेल यांच्यावर सत्तूर व चाकूसारख्या धारदार शस्त्रांनी वार केले.मुराद पटेल यांनी आरडाओरड करताच मदरसामधील मुलांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. मुलांना पाहून हल्लेखोरांनी दुचाकीवरून पलायन केले. या हल्ल्यात पटेल यांच्या हात, पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच गावातील तरुणांनी घटनास्थळी येऊन मुराद पटेल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. याघटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली असून, पोेलीस निरीक्षक विनायक वेताळ अधिक तपास करीत आहेत.