शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार येत्या शुक्रवारी साताऱ्यात, लोकसभेसाठी चाचपणी करुन उमेदवाराचा निर्णय घेणार

By नितीन काळेल | Updated: March 27, 2024 17:51 IST

महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटात मतदारसंघ मिळविण्यावरुन रस्सीखेच

सातारा : लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडी वाढत असून महाविकास आघाडी तसेच महायुतीचाही सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार अजून ठरलेला नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी साताऱ्याला धावती भेट देत असून प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उमेदवारीची चाचपणी करणार आहेत. त्यामुळे साताऱ्याचा आघाडीचा उमेदवार लवकरच ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.लोकसभेची निवडणूक जाहीर होऊन १२ दिवस झाले आहेत. मात्र, महाविकास आघाडी तसेच महायुतीतूनही सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरलेला नाही. महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या अजित पवार गटात मतदारसंघ मिळविण्यावरुन रस्सीखेच सुरू आहे. यावर अजून तोडगा निघालेला नाही. तर आघाडीत राष्ट्रवादीचा शरद पवार गट निवडणूक लढविणार आहे. या गटाचाही उमेदवार अजून निश्चित नाही. राष्ट्रवादी अंतर्गतच काही रुसवे-फुगवे आहेत. त्यामुळे उमेदवारी निश्चीत करण्यात वेळ जात आहे. त्यातच महायुतीचा उमेदवार ठरल्यानंतरच शरद पवार आपले फासे टाकतील अशीही अटकळ बांधली जात आहे. या पार्श्वभूमीवरच शरद पवार हे शुक्रवारी सकाळी साताऱ्यात येत आहेत. काही तासासाठीच ते येत असून प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक घेणार आहेत. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण असावा, कोणाचा विरोध आहे का ? याचीही चाचपणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शुक्रवारच्या या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेलिकाॅप्टरने येणार;  इंडिया आघाडी नेत्यांबरोबरही बैठक..शुक्रवारी सकाळी शरद पवार हे मुंबईवरून हेलिकॉप्टरने साताऱ्यात येणार आहेत. त्यानंतर ११ ते १ या वेळेत राष्ट्रवादीची बैठक सातारा शहराजवळ कोडोली येथील साई सम्राट हॉलमध्ये होणार आहे. या बैठकीत सातारा लोकसभा मतदारसंघ उमेदवाराबद्दल चर्चा करणार आहेत.  तर दुपारी अडीच वाजता इंडिया आघाडी नेत्यांबरोबर बैठक होईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता ते मुंबईला जाणार आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरlok sabhaलोकसभाSharad Pawarशरद पवार