शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Shambhuraj Desai: शंभूराज देसाई यांना दुसऱ्यांदा लाल दिवा

By दीपक शिंदे | Updated: August 9, 2022 12:50 IST

महाविकास आघाडी सरकारमध्ये देसाई यांनी गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती

सातारा : राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार अखेर आज, मंगळवारी सकाळी पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आमदारांना मंत्रिमंपदाची शपथ दिली. आज मंत्रिमंडळात भाजपच्या ९ आणि शिंदे गटाच्य ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील आमदार शंभूराज शिवाजीराव देसाई यांनी देखील शपथ घेतली. महाविकास आघाडी सरकारमध्ये देसाई यांनी गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळली होती. शिंदे-फडणवीस सरकारमध्येही त्यांना संधी मिळाली आहे.शंभूराज शिवाजीराव देसाई यांचा परिचय-नाव - शंभूराज शिवाजीराव देसाईशिक्षण - पदवीधरव्यवसाय - उद्योग>>शंभूराज देसाई हे पाटण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून आले आहेत. २००४, २०१४ आणि २०१९ असे तीन वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. पाटण मतदारसंघामध्ये पाटणकर आणि देसाई हे परंपरागत राजकीय विरोधक आहेत.>>शंभूराज देसाई हे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे नातू आहेत. त्यांनी १९८६ ते ९६ या काळात लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहिले.

>>१९९२ ते २००२ या कालावधीत ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते. १९९७ ते २००२ मध्ये ते बँक ऑफ महाराष्ट्रचे कौन्सिल सदस्य होते.>>महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात ते गृहराज्यमंत्री होते. त्यांच्याकडे अर्थ व नियोजन, उत्पादन शुल्क, विपणन, कौशल्य विकास आणि उद्योजकता विकास ही खाती होती. तसेच वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईEknath Shindeएकनाथ शिंदे