शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

श्रावण सोहळ्यात ‘सखीं’चा आनंद द्विगुणित...

By admin | Updated: August 28, 2014 22:21 IST

उत्स्फूर्त प्रतिसाद : मेहंदी, रांगोळी, केशरचना स्पर्धेसह विविध कार्यक्रम

सातारा : श्रावण महिन्यात मंगळागौरीचे खेळ आणि सणावारांना उधाण येतं. मग हातावर नक्षी रेखाटायची असो, किंवा दारात रांगोळीचा सडा घालायचा असो. सखीच्या उत्साहाला सीमाच राहत नाही. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत सखी मंच’ने आयोजित केलेल्या श्रावण सोहळा कार्यक्रमाने सखींचा आनंद द्विगुणीत केला. मेहंदी, रांगोळी, केशरचना स्पर्धेसह विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.येथील गोडोलीतील धनलक्ष्मी मंगल कार्यालयात ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ‘लोकमत’चे संस्थापक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलानाने हेम एजन्सीजचे हेमंत शहा यांनी केले. यावेळी टीव्हीएस कंपनीचे टीपीएल अरुण रूपनर, हेम टीव्हीएसचे मॅनेंजर राजेंद्र राजे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व हेम टीव्हीएस मोटर्स यांनी स्वीकारले होते. या कार्यक्रमात स्कूटीच्या डिझाईनमध्ये रंग भरण्याची स्पर्धा घेण्यात आली. सखींनी आपल्या कल्पकतेने त्यामध्ये हिरवा, पांढरा, निळा, पिवळा, लाल असे रंग भरले. या स्पर्धेलाही सखींना प्रतिसाद दिला. फुगे फुगवून फोडण्याचीही स्पर्धा झाली. यामुळे सखींची चांगलीच करमणूक झाली. या स्पर्धेलाही सखींनी दाद दिली. पंजाबी, चुडीदार ड्रेस परिधान केलेल्या सखींंसाठी म्युझिक डान्सची स्पर्धा झाली. शेवटपर्यंत डान्स करणाऱ्या सखींना बक्षिसे देण्यात आली. त्याचबरोबर दोरी उडी ही स्पर्धाही झाली. बकेटमध्ये बॉल टाकणे स्पर्धेला सखींचा प्रतिसाद मिळाला. बॉल बकेटमध्ये टाकताना सखींना कसरत करावी लागत होती. काही बॉल बकेटमध्ये पडत तर काही बाजूला जात. यामुळे खेळणाऱ्या सखींबरोबरच उपस्थित सखींतूनही हास्य निर्माण होत होते. या सर्व स्पर्धांचे परीक्षण इम्प्रेशन ब्युटी पार्लरच्या संचालिका व प्रसिद्ध सौंदर्यतज्ज्ञ स्वाती ओक यांनी केले. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. (प्रतिनिधी)