शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘शाहूपुरी’त उदयनराजे समर्थकांचीच सत्ता!

By admin | Updated: May 29, 2017 23:03 IST

‘शाहूपुरी’त उदयनराजे समर्थकांचीच सत्ता!

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या येथील शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील काळभैरवनाथ पॅनेलने ११ जागा जिंकत सत्ता मिळविली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक भारत भोसले यांच्या शाहूपुरी विकास आघाडीने ६ जागांवर विजय मिळविला. या निवडणुकीत १७ जागांसाठी ५४ उमेदवारांनी नशीब आजमावले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयामध्ये सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी झाली. या निवडणुकीतील निकाल धक्कादायक तर लागलेच, परंतु केवळ ५० ते १०० मतांच्या फरकाने बहुतांश उमेदवार निवडून आले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष करीत गुलालाची उधळण केली. काळभैरवनाथ पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते : रमेश धुमाळ (६८८), राजू गिरीगोसावी (१३५३), धनश्री ग्रामोपाध्ये (८२९). मुग्धा पुरोहित (७४१), अमृता प्रभाळे (३३७), मयुरा कुलकर्णी (५६९), सुधाकर यादव (८४७), लिलाबाई शितोळे (९३८), गणेश आर्डे (६४०), शंकर किर्दत (८२३), लता राजपुरे (७१२).शाहूपुरी ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते : राजेंद्र मोहिते (६२४), माधवी शेटे (६00), नवनाथ जाधव (६८३), शोभा राजेंद केंडे (८0८), सुहास वहाळकर (४0८), निलम देशमुख (८0५). भाजपचा धुव्वाकेंद्रात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या भाजपने या निवडणुकीत १२ उमेदवार उभे केले होते. परंतु या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही. फेरमतमोजणीची मागणीवॉर्ड क्रमांक पाच मध्ये ग्रामविकास आघाडीच्या निलम देशमुख या ८०५ मते घेऊन विजयी झाल्या. तर त्यांच्या विरोधातील काळभैरव पॅनेलच्या उमेदवार आशा गुजर यांना ८०१ मते मिळाली. चार मतांचा फरक असल्याने गुजर यांच्यावतीने फेरमतमोजणी घेण्याची मागणी करण्यात आली; परंतु तरीही देशमुख यांनाच ४ मते जास्त मिळत असल्याने देशमुख यांना विजयी घोषित करण्यात आले. राजेंद्र गिरीगोसावी यांना विक्रमी मतेकाळभैरवनाथ पॅनेलचे राजेंद्र गिरीगोसावी यांनी विरोधातील तीन उमेदवारांचा पुरता धुव्वा उडवीत विक्रमी मतांनी विजय मिळविला आहे. त्यांना १३५३ मते मिळाली. जवळपास १००० इतक्या मतांनी ते निवडून आले आहेत. पंचायत समिती निवडणुकीत संजय पाटील हे ७०० मतांनी विजय ठरले होते. त्यापुढे पाऊल टाकत गिरीगोसावी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्या क्रमांकाच्या वॉर्डमधून १००० मतांचे मताधिक्क्य घेतले आहे.