शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

शाहूपुरी पोलिसांची कारवाई : आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

By admin | Updated: January 7, 2015 23:25 IST

अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

सातारा : सांबरवाडी, ता. सातारा येथील शंकर रघुनाथ भोसले या दुचाकी चोरट्याकडून शाहूपुरी पोलिसांनी सात दुचाकी हस्तगत केल्या आहेत. त्याला दि. १२ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, त्याच्याकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली.शाहूपुरी पोलीस ठाण्याचे एक पथक सोमवार, दि. ५ रोजी पेट्रोलिंग करत असताना त्यांना बोगदा परिसरातील नाना चौकात शंकर रघुनाथ भोसले (वय ३०) दुचाकीवरून यवतेश्वर बाजूने जाताना दिसून आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला हटकले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याजवळील दुचाकी चोरीची असल्याचे उघड झाले. त्याच्याकडे आणखी कसून चौकशी केली असता त्याने सात मोटारसायकली चोरून नेल्याची कल्पना दिली.शंकर भोसले याने सातारा शहरातील राजवाडा भाजी मंडईसमोरून (आरजे 0७ एसजे ४१५९), यादोगोपाळ पेठेतील सुपनेकर खानावळ आवारातून (एमएच ११ क्यू ३४५७), राजवाडा नगरवाचनालय आवारातून (एमएच ११ एल ७६४९), अंनत इंग्लिश स्कूलच्या गेटसमोरून (एमएच ११ झेड ४६६५), यादोगोपाळ पेठेतील आनंदरंग अपार्टमेंटमधून (एमएच ११ डी ६१२९), सोमवार पेठेतून (एमएच ११ झेड ८७४६), तुळजाभवानी कॉम्पलेक्स पार्किंगमधून (एमएच 0४ सी ६५३२) तर एक अन्य एक अशा सात मोटारसायकली चोरल्याची माहिती दिली. त्याच्याकडून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या कारवाई पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे नसीमखान फरास, राकेश देवकर, अतिश घाडगे, किशोर जाधव, प्रवीण गोरे, श्रीनिवास देशमुख, लैलेश फडतरे, मनोहर वाघमळे, गिरीश रेड्डी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)उलट्या नंबर प्लेटने केला घात...शाहूपुरी पोलीस ठाण्याचे रात्रगस्तीचे पोलीस बोगदा परिसरात पेट्रोलिंग करत असताना शंकर भोसले दुचाकीवरून यवतेश्वरकडे निघाला होता. त्याची हालचाल संशयास्पद होती. तो जी दुचाकी (आरजे 0७ एसजे ४१५९) चालवत होता, त्यावर त्याने नंबरप्लेट उलटी लावली होती. यावेळी पोलिसांनी त्याला अडवून त्याचे नाव आणि गाव विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, शंकरने जर नंबरप्लेट उलटी लावली नसती तर कदाचित तो पोलिसांना सापडला देखील नसता.