शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
3
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
4
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
5
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
6
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
7
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
8
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
9
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
10
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
11
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
12
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
13
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
14
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
15
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
16
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
17
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
18
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
20
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा

शाहूपुरीत माजी सरपंचांकडून धक्का

By admin | Updated: May 21, 2017 01:03 IST

सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग : भाजपकडून नाराजांना आॅफर

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी काळभैरवनाथ पॅनेलला याच आघाडीकडून सरपंच बनलेल्या रेश्मा गिरीगोसावी यांनी जोरदार धक्का दिला आहे. पॅनेलला रामराम ठोकत त्यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने शाहूपुरीतल्या अंतर्गत राजकारणाचे प्रतिबिंब लोकांपुढे आले आहे. शाहूपुरी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सुरु आहे. १७ जागांसाठी २७ मे रोजी मतदान घेतले जाणार आहे. निवडणुकीला आठवडा उरला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांच्या नेतृत्वाखालील काळभैरवनाथ पॅनेल, भारत भोसले यांच्या नेतृत्वाखालील शाहूपुरी विकास आघाडी व भारतीय जनता पार्टीचे पॅनेल अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. काळभैरवनाथ व शाहूपुरी विकास आघाडी या दोन्ही पॅनेलने १७ जागांवर उमेदवार उभे केलेत. भाजपने १२ जागांवर उमेदवार उभे केले. दरम्यान, माजी सरपंच रेश्मा गिरीगोसावी यांनी काळभैरवनाथ पॅनेलला रामराम ठोकत अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने शाहूपुरीत जोरदार चर्चा सुरु आहे. काळभैरवचे पॅनेलप्रमुख संजय पाटील यांच्याशी विकास कामांच्या श्रेयवादातून त्यांचे बिनसले असल्याची जोरदार चर्चा आहे. सरपंचच बाजूला गेल्या असल्याने काळभैरवनाथ पॅनेलला मोठा धक्का बसला आहे. अनिता जांभळे, मिलींद चव्हाण, अ‍ॅड. योगेश साळुंखे या संजय पाटील यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनीही त्यांच्याशी फारकत घेतली आहे. दुसऱ्या बाजूला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मानणारा भारत भोसले यांच्यासह, सतीश सूर्यवंशी, चंदन जाधव यांनी आमदार गटातर्फे काम सुरु केले आहे.मानस मित्र समूहाचे निलेश धनावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी यांची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे, ही मंडळी एकवटण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करु, असे धनावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. तिसरीकडे भारतीय जनता पक्षातर्फे मागील पंचायत समिती निवडणूक लढलेले रामदास धुमाळ संजय पाटील यांच्यासोबत प्रचारात आहेत. काळभैरवच्या फ्लेक्सवर त्यांचे फोटो झळकले आहेत. भाजपला ऐनवेळी याठिकाणी नेतृत्व बदल करुन संजय लेवे यांच्या खांद्यावर जबाबदारी द्यावी लागली आहे. नेत्यांच्या हालचाली पडद्यामागूनशहराजवळची मोठी ग्रामपंचायत असलेल्या शाहूपुरी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली असताना खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व भाजपचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्या हालचाली पडद्यामागून सुरु आहेत. सातारा शहराच्या हद्दवाढीची अधिसूचना जारी झाली असल्याने २७ मे पर्यंत काय होईल?, हे कोणीही सांगू शकत नाही. खासदार व आमदारांच्या गटांकडून शहराच्या हद्दवाढीवरुन जोरदार श्रेयवाद सुरु आहे. या परिस्थितीत नेते पुढे येणार का? हा प्रश्न शाहूपुरीवासियांना पडला आहे. पंचायत समिती निवडणुकीत भाजप उमेदवाराला चांगली मते पडली असल्याने त्यांनीही बळ धरले आहे.