शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शहीद धनावडेंच्या मुलांचा शिक्षण खर्च उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 23:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : ‘शहीद जवान रवींद्र धनावडे यांच्या कुटुंबीयाच्या दु:खात आपण सहभागी आहोत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी शासन उचलणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक मदतीबरोबरच पुढील कोणत्याही अडी-अडचणी सोडविण्यासाठी शासन कटीबध्द आहे,’ अशी ग्वाही राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कमहाबळेश्वर : ‘शहीद जवान रवींद्र धनावडे यांच्या कुटुंबीयाच्या दु:खात आपण सहभागी आहोत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी शासन उचलणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या आर्थिक मदतीबरोबरच पुढील कोणत्याही अडी-अडचणी सोडविण्यासाठी शासन कटीबध्द आहे,’ अशी ग्वाही राज्याचे महसूल तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या हिंदू स्मशानभूमी व सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर पालिका सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, प्रांताधिकारी अस्मीता मोरे, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, नगरसेवक किसन शिंदे, भाजप प्रवक्ते भरत पाटील, भाजपा जिल्हा प्रमुख विक्रम पावस्कर, सरचिटणीस रवींद्र कुंभारदरे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी शहीद जवान रवींद्र धनावडे व स्वातंत्र्यसैनिक दिवंगत भि. दा. भिलारे (गुरूजी) यांना उपस्थित मान्यवरांकडून श्रध्दांजली वाहण्यात आली. यानंतर मंत्री पाटील म्हणाले, ‘महाबळेश्वरात स्मशानभूमीच्या रूपाने अत्यंत सुंदर व देखणी वास्तू उभी राहिली आहे. ही स्मशान भूमी भविष्यात एक पर्यटनस्थळ म्हणून लौकिक मिळवेल. ते म्हणाले, सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची गरज भासू लागली आहे. आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवत आहे. ही भीती येथे आलेल्या प्रत्येकाला वाटली पाहिजे. पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेमुळे पालिकेसह पोलिसांचेही काम सोपे होणार आहे.महाबळेश्वरमधील रस्ते खड्डेमय झाले असून, पावसाळा संपताच सर्व रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग व मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा सुरूर-पोलादपूर या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा, यासाठी प्रस्ताव तयार करण्याचेही आदेश दिले आहेत,’ असेही ते म्हणाले.यावेळी आमदार शशिकांत शिंदे, नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. विविध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या बाजीराव शेलार, कोमल प्रभाळे, कल्याणी शिंत्रे व शब्बीर नालबंद या प्राध्यापकांचा सत्कार मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अनुदान वाटप व महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटनही मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. नगरसेवक कुमार शिंदे यांनी प्रास्ताविक केले.यावेळी अविनाश शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, माजी सभापती अमित कदम, नगरसेवक धनंजय जांभळे, अ‍ॅड. संजय जंगम, जीवन महाबळेश्वरकर, मधुकर साळुंखे, विशाल तोष्णीवाल, प्रदीप कात्रट, राजेंद्र पुजारी, शरद बावळेकर, महादेव जाधव उपस्थित होते.