शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी हरवली!, कडाक्याच्या थंडीत वृद्धाला कारमधून आणून सिव्हिलसमोर सोडलं, साताऱ्यातील प्रकार

By दत्ता यादव | Updated: January 17, 2024 14:04 IST

पाच दिवस रस्त्याच्याकडेला थंडीत मुक्काम

सातारा : अलीकडच्या पिढीला घरातील वृद्ध अडसर वाटू लागले आहेत. वृद्धत्व तसेच आजारपणामुळे अंथरुणावर खिळून असलेल्या वृद्धांना घराबाहेर काढले जात आहे. असाच काहीसा प्रकार साताऱ्यात घडला असून, एका सत्तर वर्षांच्या आजोबांना कारमधून आणून सिव्हिलसमोर सोडलं गेलं. ना त्यांना बोलता येते ना चालता येते. तब्बल पाच दिवस ऐन थंडीत त्यांनी पाच रात्री रस्त्यावर घालविल्या. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे सातारकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या समोरील रस्त्याच्याकडेला एक सत्तर वर्षीय आजोबा विव्हळत पडले होते. काही नागरिकांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना बोलता येत नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी सिव्हिल परिसरातील काही लोकांना या आजोबांबद्दल काही माहिती आहे का, हे विचारले असता काही लोकांनी सांगितले, या आजोबांना पाच दिवसांपूर्वी एका कारमधून आणून या ठिकाणी सोडण्यात आलं आहे. रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

संबंधित कारचा नंबरही कोणी पाहिला नाही. त्यामुळे आजोबांना या ठिकाणी सोडणारे नेमके कोण होते, हे समोर आले नाही. थंडीमुळे आजोबा कुडकुडत असल्यामुळे काही लोकांनी त्यांना जेवणही दिले. तसेच त्यांच्या अंगावर चादर टाकली. तेव्हा कुठे त्यांना ऊब आली.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते रवी बोडके यांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेऊन आजोबांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल केले. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्या आजोबांना वेळे येथील माझ्या निवारा केंद्रात नेले जाणार असल्याचे रवी बोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.  

आजोबांना बऱ्याच व्याधी..त्या आजोबांना बोलता, उठता आणि बसताही येत नाही. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन संबंधितांनी आजोबांना या ठिकाणी आणून सोडलं, असल्याचं बोललं जातंय. त्यांना बऱ्याच व्याधी असल्यामुळे त्यांची ओळख पटवणे मोठे आव्हान असणार आहे. 

आजोबांना वाऱ्यावर सोडणाऱ्यांचा शोध घ्या..आजोबांना ऐन थंडीत पाच रात्री रस्त्यावर काढाव्या लागल्या. ज्या कोणी त्यांना असे वाऱ्यावर सोडले आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सातारकरांमधून होऊ लागली आहे.  

टॅग्स :Satara areaसातारा परिसर