शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सातारा : कोयना प्रकल्पाच्या अनेक वाहनांचा खुळखुळा, सहा वाहने बंद स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 12:49 IST

कोयना जलसिंचन विभागाकडील अकरा वाहनांपैकी सहा वाहने पूर्ण बंद अवस्थेत आहेत. या वाहनांअभावी चालकांना काम करावे लागत आहेत.

ठळक मुद्देकोयनाच्या अनेक वाहनांचा खुळखुळा, सहा वाहने बंद स्थितीत चालू वाहनांचीही दुरवस्था; जलसिंचन विभागाकडे वाहनांची कमतरता

कोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱ्या कोयना नदीवरील धरण व जलविद्युत प्रकल्पाने महाराष्ट्राच्या पिण्याचे पाणी व शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला आहे. येथील जलसिंचन विभागाच्या अंतर्गत विविध उपविभाग कार्यरत आहेत. या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना वाहनांची आवश्यकता असते. मात्र, कोयना जलसिंचन विभागाकडील अकरा वाहनांपैकी सहा वाहने पूर्ण बंद अवस्थेत आहेत. या वाहनांअभावी चालकांना काम करावे लागत आहेत.विद्युतनिर्मित व पाणीसाठ्यासाठी महाराष्ट्रात कोयना प्रकल्प अग्रेसर आहे. या प्रकल्पातील अधिकारी कर्मचाऱ्यांना वाहनांच्या कमतरतेने व नादुरुस्तीमुळे प्रकल्पाच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी व इतर ठिकाणी कामानिमित्त जाताना गैरसोय होत आहे. तरी शासन प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या प्रकल्पाच्या सोयी-सुविधा व देखभालीकडे लक्ष द्यावे लागते.सुमारे १०५.२५ टीएमसी एवढ्या मोठ्या क्षमतेने पाणीसाठा असणारा कोयना प्रकल्प महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र राज्यांसाठी वरदान ठरलेला आहे. परंतु हा प्रकल्प देखभाल दुरुस्ती व सोयी सुविधेअभावी दुर्लक्षित होत आहे. कोयनानगरला धरणाची निर्मिती झाल्यानंतर १९६७ मध्ये भूकंपाच्या धक्क्याने हादरलेल्या प्रकल्पाने काही वर्षांत उभारी घेतली.

कोयना भाग निसर्गाने बहारलेला आहे. तसा कोयना धरण विविध कार्यालये व जलविद्युत प्रकल्पामुळे कोयना नगरी व परिसर समृद्ध झाला होता. परंतु गत काही वर्षांपासून कोयना प्रकल्पाला ग्रहण लागले असून, कोयनेतील अनेक शासकीय कार्यालये इतरत्र हलविण्यात आली तर येथे सुरू असणारी प्रकल्पातील अनेक कामे ठप्प झाली.नेहरू गार्डन, पॅगोडा, विश्रामगृह आदींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कोयनाप्रकल्पासह कोयना बकाल व ओसाड झाली आहे. या प्रकल्पाने राज्याला खूप दिले. मात्र, त्याबदल्यात या प्रकल्पाला व प्रकल्पग्रस्तांना शासन व प्रशासन पातळीवर दखल घेतली गेली नाही.

टॅग्स :GovernmentसरकारSatara areaसातारा परिसर