शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा दुरुस्ती... अजून जरा थांबा, अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 11:52 IST

खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सातबारा दुरुस्तीसाठीचा १५५ चा अर्ज गेल्या सहा महिन्यांपूर्वी केला होता. त्या अर्जाची दखल अजून घेतली जात नाही. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांला जाब विचारला असता. तर अजून जरा थांबा, असेच उत्तर मिळत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तहसील प्रशासनाबाबत उदासिनता निर्र्माण होत आहे.

ठळक मुद्दे सातबारा दुरुस्ती... अजून जरा थांबा, अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांना उत्तरे तहसील प्रशासनाचा अनेकांना फटका

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी सातबारा दुरुस्तीसाठीचा १५५ चा अर्ज गेल्या सहा महिन्यांपूर्वी केला होता. त्या अर्जाची दखल अजून घेतली जात नाही. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांला जाब विचारला असता. तर अजून जरा थांबा, असेच उत्तर मिळत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तहसील प्रशासनाबाबत उदासिनता निर्र्माण होत आहे.खटाव तालुक्यातील चोराडे, वडगाव, निमसोड म्हासुर्णे, गोरेगाव (वांगी), रहाटणी, शेनवडी, कळंबी येथील शेतकऱ्यांना सातबारा दुरुस्तीसाठीचा १५५ चा अर्ज व आॅनलाईन सातबारा काढण्यास वडूज तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.

आॅनलाईन सातबारा दुरुस्तीसाठी १५५ चा अर्ज व नवीन रेशनकार्ड काढण्यास दिलेल्या अर्जदारांनी किती दिवस वडूजवारी करायची, याचा विचार अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत असून, याबाबत वडूज तहसीलदार लक्ष घालणार का ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.त्याचबरोबर सातबारा काढणारे सर्व्हर डाऊन तर कधी नेट बंद, अधिकारी असे कारणे देऊन, याचे आज काम होणार नाही. दोन दिवसांनी या, असे सांगून शेतकऱ्यांना माघारी पाठवले जात आहे. तसेच दोन दिवसांनी आल्यावर त्याच पद्धतीने उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुसतीच मोकळी वडूजवारी करावी लागत आहे.सध्या शासनाने आॅनलाईन सातबारा उतारा असल्याशिवाय कोणताही जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, वारस नोंदी, हक्कसोडपत्र, बँकबोजा, सातबारा दुरुस्ती आदी कामांसाठी आॅनलाईन सातबारा आवश्यक केले. त्यातच आता मार्च एंड चालू असून, सातबाऱ्यांची आवश्यकता असल्यामुळे शेतकऱ्यांला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. बँकांनी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आॅनलाईन सातबारा त्यांच्या दुरुस्ती करण्यास अमाप खर्च येत आहे.तसेच तलाठ्यांनी आॅनलाईन उतारे करताना अनेक चुका केल्यामुळे सातबारा दुरुस्तीसाठी तहसीलदारांना अर्ज करावे लागत असल्यामुळे कामे वेळेवर होत नाहीत. तरी याकडे गांभीर्याने प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांची कोणतीही कामे वेळेत होत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना वडूजला मोकळे हेलपाटे मारावे लागत असल्याचे चित्र दिसत आहेत.वडूज तहसील कार्यालयात वारंवार हेलपाटे मारूनही आॅनलाईन सातबारा उताऱ्यांची दुरुस्ती केली जात नाही. आॅनलाईन सातबारा भरताना संबंधित अधिकाऱ्यांकंडून चुका झालेल्या आहेत. ही दुरुस्ती करण्यासाठी शेतकऱ्यांना १५५ चा अर्ज तहसीलदाराच्या नावे द्यावा लागत आहे. तरी ही पद्धत बंद करून तलाठ्यांना अधिकार देऊन सातबारा उतारे दुरुस्त करून दिले पाहिजेत. 

टॅग्स :GovernmentसरकारSatara areaसातारा परिसर