शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

पुण्याकडे जाणाºया ‘हायवे’वर सात किलोमीटरच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 23:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : एसटी कर्मचाºयांच्या संप कालावधीत कसेबसे गावी आलेल्या चाकरमान्यांना परत जातानाही वाहतुकीच्या कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागला. पुण्याकडे जाणाºया पुणे-बेंगलोर हायवेवर सुमारे सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यास्तव अनेकांना ताटकळत राहावे लागले.दिवाळीची सुटी संपवून चाकरमनी पुणे, मुंबईला रविवारी निघाले होते. सोमवारी कामावर हजर ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : एसटी कर्मचाºयांच्या संप कालावधीत कसेबसे गावी आलेल्या चाकरमान्यांना परत जातानाही वाहतुकीच्या कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागला. पुण्याकडे जाणाºया पुणे-बेंगलोर हायवेवर सुमारे सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यास्तव अनेकांना ताटकळत राहावे लागले.दिवाळीची सुटी संपवून चाकरमनी पुणे, मुंबईला रविवारी निघाले होते. सोमवारी कामावर हजर राहण्यासाठी अनेकजण रविवारी सकाळीच घरातून बाहेर पडले. परंतु महामार्गावर सहा ते सात किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने अनेक प्रवासी अडकून राहिले. पुणे आणि कोल्हापूर बाजूकडून वाहतूक ठप्प झाली होती. खेड ते लिंबखिंड परिसरापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. सातारा शहरातून वाहतूक वळविण्यात आली होती. तर फलटण रस्ता आणि सर्व्हिस रस्त्यावरूनही वाहने सोडण्यात येत होती. कुठेतरी अपघात झाला असेल, असे प्रवाशांना वाटत होते. मात्र पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर असा कोणताही अपघात झाला नसल्याचे सांगण्यात आले. दिवाळीची सुटी संपवून चाकरमनी रविवारी एकाचवेळी निघाल्याने ही परिस्थिती झाल्याचे पोलिसांनी सांगितले.सातारा बसस्थानकातही हीच परिस्थिती होती. पुणे विनाथांबा जाणाºया प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. रखरखत्या उन्हातही प्रवासी रांगेमध्ये उभे राहिले होते. रात्री उशिरापर्यंत बसस्थानकात प्रवाशांची गर्दी होती.