सातारा : जिल्ह्यातील सेतू केंद्र, आधार केंद्र, चार्टर्ड अकाउंटंट कार्यालय या आस्थापनांना सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत परवानगी दिली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी मंगळवारी काढले.
जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढत असताना सर्व शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस पूर्ण बंद ठेवण्यात येतील, असे आदेशात म्हटले आहे. मात्र वैद्यकीय महाविद्यालय नर्सिंग कोर्सेस ठेवण्यास परवानगी दिली आहे.
कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यामध्ये आटोक्यात येत असताना निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. अत्यावश्यक सेवेतील किराणा व इतर दुकानांना परवानगी देण्यात आली होती. सेतू केंद्र, आधार केंद्रे आणि चार्टर्ड अकाउंटंट यांची कार्यालय सुरू नसल्याने सर्वच क्षेत्रांतील व्यवहार पूर्णतः ठप्प झाले होते. सध्याच्या घडीला कार्यालय सुरू ठेवणे गरजेचे असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहेत.