शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

धोमच्या फार्म हाऊसवर बंदोबस्त

By admin | Updated: August 19, 2016 00:16 IST

‘लोकमत’च्या वृत्तानंतर-

संजीव वरे-- पसरणी  -क्रूरकर्मा संतोष पोळचा फार्म हाऊस पाहण्यासाठी धोमकडे गाड्यांच्या रांगा... त्याचे शेत बनले प्रेक्षणीय स्थळ... ही बातमी गुरुवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी बंदोबस्त लावला तसेच त्याच्या फार्म हाऊसचे फाटकही कुलूपबंद करून आतील महत्त्वाचे सर्व पुरावे ताब्यात घेतले. चार मृतदेह त्याच्या ज्या शेतात सापडले ते ठिकाण जणू आता बघ्यांसाठी प्रेक्षणीय स्थळच बनले होते. तर त्याने अनेकांविरोधात केलेल्या तक्रारींचे कागद त्याच्या येथील खोलीत पडलेले बाहेरून स्पष्टपणे दिसून येत होते. ज्या दुचाकीवरून त्याने भिरकीट केली ती दुचाकीही येथेच होती. खड्डे खणण्यासाठी वापरण्यात आलेला जेसीबीही गावाच्या प्रवेशद्वारावर दिसला होता. वाईहून धोमकडे गाडी गेली अजून किती? धोम धरण परिसरात आणखी पाचजण? पोळचे सर्वच फार्म हाऊस आणि पोल्ट्री फार्मचे उत्खनन केले तर गेल्या १३ वर्षांतील सर्वच बेपत्ता सापडतील का? याबाबत तालुक्यातील प्रत्येक गावात चर्चेचा विषय ठरला होता. पोळच्या पोलिस तपासातून आणखी किती प्रकरणाची सत्यता बाहेर येणार? याबाबतची अस्वस्थ करणारे वातावरण सध्या पाहावयास मिळत होते. गेल्या १३ वर्षांच्या ‘पापाचा घडा’ वेलंग येथील मंगल जेधे याच्या खुनाच्या तपासात समोर आला आणि त्यानंतर त्याच्या कारनाम्याचे रूप त्याच्या घराजवळील व फार्म हाऊसवरील मृतदेह एक-एक बाहेर काढताना पाहिले. अजूनही एखादी प्रशासनाची गाडी गेली, अशी बातमी समजताच अजून किती? धोम धरण परिसरात अजून पाचजणांचे मृतदेह आहेत? पोळ याचे सर्वच फार्म हॉऊस आणि पोल्ट्री फार्मचे उत्खनन केले तर वाई तालुका व शेजारी तालुक्यातील अनेक बेपत्ता सापडतील का? अशा अफवा व चर्चांना उधाण आले होते.